The Sapiens News

The Sapiens News

नाशिक : स्वप्नरंजन व वास्तव, प्रकल्प : गोदापार्क

का होते नाशिकच्या सुंदर प्रकल्पांची दूरवस्था ?

Like करून पूर्ण video पहा.

https://youtube.com/shorts/QIHOqBIs1Ps?si=wTgdDMMidUiGJ6WD
दुर्दशा : गोदापात्रात थेट गटारीचे पाणी, महानगरपालिकेचे अक्षम दुर्लक्ष..

● समस्याग्रस्त प्रकल्पाची पश्वभूमी
नासिकमध्ये महानगरपालिकेच्या अंतर्गत अनेक सुंदर प्रकल्पांची निर्मिती केली जाते. जसे फाळके स्मारक, गोदापार्क, कानेटकर उद्यान, संत तुकाराम महाराज गार्डन, बॉटणीक गार्डन, अहिल्याबाई होळकर पूलावरील संगीत कारंजे, कुसुमाग्रज उद्यान, गोदापार्क, उड्डाणपूला खालील गार्डन, मुबंई नाका सर्कल, स्मार्ट सिटी अंतर्गत जुना अग्रारोड रस्ता, तारांगण, जलतरण तलाव. परंतु काही काळातच त्याची अक्षरशः वाट लागते असे का होते त्याची कारणे शोधण्याचा हा छोटासा प्रयत्न. दि सेपिअन्स न्युजच्या माध्यमातून.

● आजचा प्रकल्प : गोदापार्क
५/१०/२०१३ रोजी गोदापार्क ही भविष्यात साकारणारी सुंदर व नासिकच्या सोंदर्यात अधिक भर घालणाऱ्या प्रकल्प वजा संकल्पनेचे प्रेझेंटेशन राज ठाकरे यांच्या माध्यमातून नासिकरांना पहावयास मिळाली. अतिशय दिमाखात गाजावाज्या करीत हे स्वप्न नासिकरांना दाखवण्यात आले. जे आपल्या लाडक्या गोदामाईच्या दोन्ही तटाला सुशोभित करण्याच्या कार्या सबंधीत होते. परंतु ते पूर्णपणे मूर्तस्वरूपात आलेच नाही. दुर्दैव हे की जेही थोडेथोडके निकृष्ट दर्जाचे अपूर्ण काम झाले ते पुरात वाहून गेले. त्याबरोबर नाशिककरांना दाखवलेले सुंदर स्वप्न ही. एखादे सुंदर स्वप्न किती विद्रुप होऊ शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गोदापार्क. जे आत्ता परत स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने आपल्या पुढे आले जात आहे. ( ज्याची तुलना या link मधील व्हिडीओत आपल्याला पहावयास मिळेल. वास्तव आणि स्वप्नरंजन या सदरात )

● स्वप्नरंजन
स्वप्नवत संकल्पनेतील गोदापार्क हे गोदावरी नदी तिरी गंगापूर नाका ते अहिल्याबाई होळकर पुला पर्यंत होते. त्याचे अंतर दोन्ही बाजूनी एकूण 13.5 किमी होते. जे ऍमूजमेंट पार्क, वॉटर स्पोर्ट्स, लेजर शो, दुर्मिळ फुलांची बाग, लहानमुलांसाठी गार्डन, संगीत कारंजे, फूड पार्क, रोप वे ने नटलेले असेल असे स्वप्न नाशिककरांना दाखविण्यात आलेले.
( खर्च, लांबी, कालावधी, संकल्पनाकार )

● वास्तव
आणि आज वास्तव हे आहे की जेथे सुंदरता असेल असे सांगण्यात आले तेथे स्वच्छता ही नाही हो पण गलिच्छपणा व विद्रूपता नक्की आहे. गुंड ,मद्यपी, नशेडीचा अडा नक्की पहावयास मिळेल गटारीचे संडासचे पाणी सर्रास व सरळ नदी पात्रात सोडलेले आहे व त्याचा अतिशय तीव्र दुर्गन्ध तेथे जाणवेल उभे राहण्यास ही इच्छा न व्हावी एवढे हे किळसवाणे वातावरण आहे. सहा वर्षांपूर्वी वैजनाथ काळे या क्रीडा प्रशिक्षकावरही येथेच हल्ला झालेला. दुर्दैव हे की तेथूनच काही अंतरावर जगभरात पवित्र मानलेल्या रामकुंड सितामाताकुंड हे आहेत. ज्या पात्रात मागे गटारीचे संडासचे पाणी सोडले जाते त्यापुढे त्याच पाण्याने मंदिरतील देवांच्या मूर्तींना स्नान घातले जाते व लोक पवित्र  स्नान करतात आपल्या पूर्वजांच्या अस्थींचे तेथेच विसर्जन करतात.

● समस्येची कारणे
1 यंत्रणांचे दुर्लक्ष
2 राजकीय अनास्था व हेवेदावे
3 भ्रष्ट व निकृष्ट बांधकाम
4 डागडुजीची कुवत नाही
5 खाबूगिरी
6 संवर्धन, संरक्षण व सुरक्षिततेची हमी नाही.
7 जनसामान्यांची अनास्था
8 कल्पकतेचा अभाव
9 सामजिक संस्था हतबल

● उपाय
आधी स्वच्छता व सुरक्षितता मग सुंदरता हे धोरण असावे. देखभाल, डागडुजी, सोंदर्यीकरन, विद्यार्थी सहभाग, नाविन्यपूर्ण उपक्रम व कार्यक्रम आयोजन, खुल्या गटार बंद करणे, पोलीसांच्या गस्त व पेट्रोलिंग वाढवणे.

● उपायांचे ५ टप्पे
१ निरीक्षण २ दुरुस्ती व डागडुजी ३ स्वच्छता ४ सुरक्षिता व ५ सोंदर्यीकरणं.

गोदापार्क स्वप्नरंजन व वस्तुस्थिती हा तुलनात्मक व्हिडीओ या लिंक वर नक्की पहा. संबंधित clip मधील छोटा व्हीडीओ स्मार्ट सिटी प्रकल्पाने केला आहे.

Leave a Comment

Vote Here

Loading poll ...
Coming Soon
Do You Like Our Website?
UPSE Coaching

Recent Posts