The Sapiens News

The Sapiens News

SBI बँकेचे अनाकलनीय नितीनियम

Disclaimer : आम्ही SBI बँकेचा अनुभव घेतला इतर बँकांचे नियम वेगळे असू शकतात. तसेच या बातमीचा उद्देश मात्र नी मात्र यंत्रणांचे व्यवहार अधिकाधिक पारदर्शक, लोकाभिमुख, कारणे देय व सुस्पष्ट असावे हा आहे.….

संपादकीय :
ही कव्हर स्टोरी स्वतः the Sapiens news चे संपादक शिरीष प्रभाकर चव्हाण यांनी अनुभवली आहे. जी त्यांच्याच शब्दात.
” नमस्कार मी The Sapiens News संपादक शिरीष चव्हाण, दर आठवड्याला the Sapiens news त्यांच्या वाचकांच्या अर्थकारणाची त्यांच्याशी निगडित आणि त्यांच्या ज्ञानात व समृद्धीत ही भर घालेल अशी माहिती वजा बातमी देण्याचा प्रयत्न करत असते. परंतु सामाजिक स्थरावर एवढ्या समस्या आहेत की काही वेगळं शोधण्याची फारशी गरजच पडत नाही, अनेकदा ते विनासायास येतं. जे मला आलेल्या पुढील अनुभवातून आपल्या पुढे मांडतो.
माझे SBI येथे गृहकर्ज आहे. Sbi ने मागील काळात अनेकदा व्याजदर वाढविले आणि आज ते ९.५  एवढे वर आहेत. तेच कमी करण्यासाठी SBI ने काही fees घेऊन कमी करण्याची सवलत ही दिली आहे. ( मग वाढवताच का हा प्रश्न येथे उपस्थित होतो फक्त अधिकचे पैसे ग्राहकांकडून काढायला का कारण आजही अनेक शासकीय व खाजगी नामांकित बँकांचे व्याजदर कमी आहे ? ) जेव्हा मी रविवार कारंजा शाखेत त्यासाठी संबंधित शाखा व्यवस्थापकांना भेटलो तर त्यांनी ही सवलत मात्र 15 लाखांच्या पुढे ज्यांचे कर्ज आहे त्यांचासाठी असल्याचे व त्या आतील कर्जदात्यांना नाही हे ही सांगितले (त्याचे परिपत्रक देखील त्यांच्याकडे उपलब्ध नव्हते ना त्यांना ते देण्यात आलेले होते.) आत्ता या मागचे तार्किक कारण त्यांच्याकडे ही नव्हते. त्यांचे उत्तर policy makers जे आदेश देतात ते त्या पदावरील व्यक्ती follow करतात. मग मी त्यांना एकच प्रश्न केला जे आमच्या सारखे ग्राहक अतिशय शिस्तबद्धपणे कर्जाचा परतावा करतात किवा अधिकचे पैसे आल्यास partially loan foreclose करतात त्यांच्यावर हा अन्याय आहे आणि ग्राहकांच्यात असा भेद करण्याचं कारण नक्की काय ? त्याचे ही उत्तर त्यांच्याकडे नव्हते.

गृहकर्ज व्याजदर कमी करण्याचे परिपत्रक संबंधित शाखा व्यवस्थापकांकडे उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले, उपलब्ध होताच आम्हाला पाठवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ते उपलब्ध होताच येथे अपलोड करण्यात येईल.


त्यानंतर मी SBI मायको सर्कल शाखेत सोने तारण कर्जाचा व्याजदर व पॉलिसी काय याची विचारणा केली, कारण तो कमी असेल तर गृहकर्ज तरी भरू असा विचार होता. तर त्यांनी व्याज दराचे तीन टप्पे सांगितले आणि पॉलिसी ही की सोन्याचे बार व बिस्कीट तारण घेत नाही. फक्त दागिने घेतो अशी बँकेची पॉलिसी असल्याचे प्रमाणासह दाखविले व ते SBI च्या संकेतस्ळावरून काढून ही दिले. मी म्हंटल असे का ? तर त्याच विशिष्ट असं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं. पण अंदाज हा होता की सोने तारण कर्ज हे अडीअडचणीत असलेल्या गरजवंतांसाठी आहे आणि गरजवंत हे दागिने घेता बार व बिस्किट वा नाणी नाही. हे ऐकल्यावर policy makers नक्की काय विचार करून policy आखतात याच मला गणित उमजले नाही. कारण वरील निकष ही मंडळी कशाच्या आधारावर ठरवतात ? एखाद्या गरजवंतास दागिन्यांनाची आवड नसेल तर तो चोख बार बिस्कीट किवा नाण्यात गुंतवणूक का नाही करणार ? आणि असेही परिधान करण्याचे सोने चोरीला जाणे, त्यांच्या मजुरीचा खर्च, घट यात आणि परतीला पूर्णपणे jewellery shop वर अवलंबून राहत तो पदरात जे टाकेल ते घेण्याची एखाद्याची इच्छा नसेल आणि केवळ गुंतवणूक म्हणून अडीअडणीस कामी येईल यासाठीच जर कुणी बिस्कीट, बार, नाण्यात गुंतवणूक करीत असेल तर त्याने ती करू नये का ?  गरजवंत आणि गरीब मध्यमवर्गीय यांनी समृद्धीचा व्यवहारिक विचार करणे सयुक्तिक नाही का ? असल्या policy करून बँका नक्की काय साध्य करीत आहे ? जर एखादी बँक गृहकर्जावर व्याज जास्त आकारीत असेल तर ती समानतेच्या अधिकारात सर्व कर्जदात्यांना कमी करून घेण्याचा अधिकार नाही का ? सर्वात महत्वाचे अशा प्रकारच्या मनस्तापाने संबंशीत बँकांचे ग्राहक राहतील की तुटतील ? नक्कीच दुखावतील व तुटतील ही मग एवढे ही तर्कशास्त्र नितिनियम करणाऱ्या व्यक्तींना कळत नसेल तर त्याला काय म्हणावे ? की यांची निती व इच्छाच ग्राहक तोडण्याची वा ग्राहकांना मनस्ताप देण्याची आहे ? हा प्रश्न येथे उपस्थित होतो आणि तसे नसेल तर अशा प्रकारच्या policy करण्यामागील हेतू वा उद्देश ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचे कर्तव्य त्यांनी बँक व्यवस्थापणा मार्फत करणे क्रमप्राप्त नाही का ? कारण तेच तर या व्यवस्थेचा दुवा असतात ? सोने तारण कर्ज ही योजना गरजू आणि गरिबांसाठी असेल तर तिचा व्याजदर गृहकर्ज, वाहनकर्ज या पेक्षा जास्त का ठेवतात तो आधी कमी करावा ना ? आणि ग्राहकांनी मनस्तापात इकडून तिकडून पैसे गोळा करुन व्याज जास्त जातं म्हणून संपूर्ण अथवा काही प्रमाणात गृहकर्ज फेडण्याचे ठरवलेच तर TAX चा ससेमिरा, एकंदर काय तरच सर्वत्र गळचेपी आणि गोंधळ की गळचेपीसाठी गोंधळ ?
आम्हाला वाटते SBI ने अथवा कोणत्याही बँकेने माधुरी दिक्षित सारखे महागडे सेलिब्रिटी घेऊन करोडो रुपये जाहिरातींवर खर्च करण्यापेक्षा ग्राहकांना सवलती व सुविधा देण्यावर अधिक भर दिल्यास अधिक फायद्याचे होईल ग्राहकांसाठी ही नी बँकेसाठी ही.
टीप : मायको सर्कल व रविवार कारंजा येथील महिला व्यवस्थापकांचे सहकार्य व त्यांचा ग्राहकाभिमुख स्वभाव व प्रतिसाद हा अतिशय सहकार्याचा होता. परंतु policy makers च्या policy चे ठोस कारण त्यांच्याकडे ही नसणे हे खेदजनक वाटले.

संबंधित माहिती SBI च्या संकेतस्थळा वर उपलब्ध आहे. ज्यात स्पष्ट म्हंटले आहे की सोनेतारण हे दागिने व फक्त बँकेने दिलेल्या सोन्याच्या नाण्यांवर उपलब्ध आहे.

संपादक
शिरीष प्रभाकर चव्हाण
The Sapiens News

Leave a Comment

Vote Here

Loading poll ...
Coming Soon
Do You Like Our Website?
UPSE Coaching

Recent Posts