१८ महिन्यांच्या नाशिकच्या रायबाचे अभिनंदनीय श्री शिव छत्रपती कार्य
देवळा : यंदा श्री शिवरायांच्या राज्यभिषेकाचे ३५० वे वर्ष आहे. त्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जात आहेत. शिवनेरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारीला मोठ्या दिमाखात शिवजयंती साजरी केली जाणार आहे. या आनंद उत्साहाच्या वातावरणात एका १८ महिन्यांच्या बाळाने पराक्रम केला आहे. एवढ्या कमी वयात त्याने शिवनेरी किल्ला सर करत छत्रपतींन आगळीवेगळी भक्ती अर्पण केले आहे. त्यामुळेच त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महाराज यांचे जन्मस्थळ असलेला शिवनेरी किल्ला सर करत शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला नाशिकच्या ता. देवळा, उमराणे गावातील शिवार्थ उर्फ रायबा देवरे याने अतिशय प्रेरणादायी अभिवादन केले. किल्ल्याच्या पायथ्यापासून तब्बल ६ तास २७ मिनिटे चालून शिवाजी महाराजांचे शिवनेरी किल्ल्यावरील जन्मस्थळ गाठले. त्यामुळे रायबाचे सर्वत्र कौतुक
होतं आहे.
रायबाचे वडील सचिन देवरे आणि आई स्नेहल देवरे यांनी रायबाला छत्रपतींच्या जयंतीनिमित्त महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर नेण्याचा मानस ठेवला होता. त्यानुसार शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला हा संकल्प त्यांनी पूर्ण केला.
रायबाचा जन्म ६ जून २०२२ रोजी शिवराज्याभिषेक दिनाच्या मूहूर्तावर झाला होता. त्याला बालवयातच शिवरायांबाबत विशेष प्रेम होते. त्याची ही ओढ लक्षात घेऊन वडील सचिन देवरे आणि आई स्नेहल देवरे यांनी रायबाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्याचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर नेण्याचा मानस ठेवला. यासाठी लागणाऱ्या सर्व कायदेशीर परवानगींची त्यांनी पूर्तता केली. काही डॉक्टरांना सोबत घेतले. यापूर्वी काही दिवस रायबाचा चालण्याचा सराव करुन घेण्यात आला. त्यानुसार आई, वडील, डॉक्टर तसेच काही जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत रायबाने शिवनेरीवर चढण्यास सुरुवात केली. तब्बल ६ तास २७ मिनिटात हा चिमुकला शिवनेरीवर पोहचला आणि त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.