वेग आणि अचूक निशाना ही वैशिष्ट्ये असलेले क्षेपणास्त्र भारत डायनेमिक्स लिमिटेड (BDL) या कंपनीने बनवलेल्या अस्त्र (Astra BVR) क्षेपणास्त्र हिंदुस्थानी वायुदलाच्या ताफ्यात दाखल झाले आहे.
अस्त्र क्षेपणास्त्र हे हवेतून हवेत मारा करणारे उच्च दर्जाचे क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य म्हणजे जिथे फायटर जेट किंवा हेलिकॉप्टरचा पायलट पाहू शकत नाही.अशा ठिकाणी सुद्धा अस्त्र क्षेपणास्त्र अचूकपणे हल्ला करण्याची क्षमता ठेवते.
सध्या अँस्ट्रा-एमके 1 (Astra-MK1) हे क्षेपणास्त्र लष्करात सामील करण्यात येणार आहे.