आपल्याला वरील म्हण ही जरी जुनी वाटत असली तरी तिचा प्रत्यय आज सामजिक स्थरावर प्रखरतेने जाणवतो. या म्हणीचा साधा सरळ अर्थ हा की एखादा बाप गावात पाटीलकी करीत फिरतो. हो पण ना त्याच घर ताळ्यावर ना त्यातील व्यक्ती, ना बायको जुमानत ना पोर ऐकत. गृह कलह तर कमालीचे असतात. कुठे सुनेने कोर्टात खटला दाखल केलेला असतो. तर कुठे जावई हाताबाहेर गेलेला आणि हा व्यक्ती समाजात चौधरीगिरी करीत फिरतो. लोकांना दाखवतो की मी खूप हुशार, मला खूप ज्ञान, माझी सरकार दरबारी मोठी वट, माझं राजकीय वर्तुळात मोठं वजन प्रत्येक्षात मात्र घरात पोरग ऐकत नाही, सून निगुण गेलेली, मुलीचा संसार तुटता तुटता वाचलेला पण याची फुशारकी आणि नको तेवढी हुशारकी संपता संपता नाही.
अशा व्यक्तीचे असे का होते. त्याची काही कारणे पुढे देत आहे.
१ स्वतःच घर सोडून दुसऱ्याच्या घरात डोकावण्याची सवय : असल्या वृत्तीची लोक कमालीची सामजिक असतात. ते स्वतःस समाजासाठी वाहून घेतात पण समाजाच्या भल्यासाठी नाही तर लोकांची घरे फोडण्यासाठी. यांना कुणाचे चांगले चाललेले चालत नाही. हे नेहमी कुठे फूट पाडता येईल व कुठे व कुणाच्या घरात कसे वाद होतील. या दृष्टीनेच काम करतात आणि हेच ते सोडवायला ही पुढे असतात अर्थात आग लागणाराच रिकामी बादली घेऊन आग विझविण्याचे नाटक करतो.
२ सर्वांवर वर्चस्व गाजवण्याची कुवृत्ती : असल्या लोकांना एक असुरी इच्छा असते. इतरांवर वर्चस्व गाजवण्याची आणि तीच क्षमविण्यासाठी हे गल्ली, कॉलनी, परिसर येथे नको ती पुढारकी करतात. यांचा दुर्दैव हे की ते जाताच लोक त्यांच्या गोष्टींचा संदर्भ देत यांची टिंगल उडवीतात.
३ आयुष्य खोट्यात वाया गेलेलं : असल्या लोकांचे आयुष्य पुरते खोट्यात असते त्यांना खोटे बोलण्याची, बढाया मारण्याची, लावालाव्या करण्याची फार वाईट सवय असते. पण असल्या गुणांच्या मुळे त्यांची सामाजिक विश्वसाहर्ता कमी होते. हेच यांच्या लक्षात येत नाही.
४ स्वतःच्या घराकडे अक्षम्य दुर्लक्ष : ही यांची सर्वात मोठी कमी असते दुसऱ्याचे घर जाळता जाळता हे लोक स्वतःच्या घरातील चूल विझत जाते आहे हे मात्र सोयीस्करपणे विसरतात. असल्या लोकांच्या घरी वाद, भांडणे, कोर्ट कचेऱ्या, पोलीस ठाण्याच्या फेऱ्या असतातच असतात. फोडायचची यांची वृत्ती एवढी तीव्र असते की यांना जर दुसऱ्याचे घर फोडायला नाही मिळाले तर हे स्वतःचेच घर मुलं सुना जावई यांच्यातही पाचर घालायला कमी करीत नाही. जसे उंदराला काही कुरतडल्या शिवाय होत नाही तसे यांचे असते ते नेहनी काही तरी कुरतडायला शोधितच असतात.
५ घरात देखील एकटे : असल्या लोकांचे शेवटी एकच होते हे लोक आयुष्याच्या शेवटी एकटे पडतात. समाजातून ही आणि घरातून ही यांना आपले दुःख भावना मांडायला देखील माणूस मिळत नाही. कारण त्यांची विश्वसनीयता हे कायमची गमावून बसतात यांच्या कुबुद्धीने. मुलांशी सोडा यांचे त्यांच्या अर्धांगिनीशी ही फाटते.
अशी ही लोक शेवटी एकाकी पडतात आणि मृत्युशय्येवर पडून आपल्या मरणाची वाट पाहत समाजावर सत्ता गाजवायला निघालेली ही नंतद्रष्ठ आपल्या मुलाचे आपल्याच हाताने संसार उध्वस्त झालेले पाहतात. दुर्दैव हे की यांना यांच्या पापाची जाण होते पण त्याला खूप वेळ झालेला असते. स्वतःच्या हाताने खाताही न येण्या व स्वतःच्या पायाने शौचायस ही न जाता येण्या येवेढा
शिरीष प्रभाकर चव्हाण : संपादक दि. सेपिअन्स न्युज