The Sapiens News

The Sapiens News

पोलीस नावाच्या माणसांच्या आत्महत्येची प्रमुख १० कारणे

https://www.thesapiensnews.com/2024/03/01/पोलीस-नावाच्या-माणसांच्य/
Disclaimer : The Sapiens News ची ही Cover Story कदाचित एखाद्याला रुचनार नाही पण पोलीस माणसास माणूस म्हणून कुटूंबात, समाजात आणि विभागातही छोटीशी आत्मसन्मानाची जागा मिळावी. हा ही cover story लिहिण्या मागील स्वच्छ, सरळ उद्देश आहे. Please Just Feel The Pain Of Policeman Because He Is Human.

पाश्वभूमी
मागील महिन्यात अंबड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अशोक नजन यांनी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हलवरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आणि पोलीस विभागासह संपूर्ण नाशिक शहरात एकच खळबळ उडाली. तसेच जेवढ्या जलदगतीने ही खळबळ उडाली तेवढ्याच जलदगतीने ती सामजिक स्तरावर विस्मरणात ही गेली वा जात आहे. आपल्या दैनंदिन गरजा व जबाबदारी पूर्ण करण्याच्या स्पर्धेत आपण सर्वच एवढे व्यस्त झालो आहोत की जणू स्वभोवताली घडणाऱ्या घटनांचे गांभीर्यच संपुष्टात आल्याचे जाणवते.
वाईट हे की समाजाचे खलांपासून रक्षण करणाराच आज स्वतःस संपविण्या मानसिकतेत अडकत व खचत जात आहे. तेही शारीरिक व मानसिक दृष्ट्या, चार दिवस समाज माध्यमांवर मोठमोठ्या गप्पा हाकणाऱ्या व मृतास काही लाखांचे पॅकेज जाहीर करून मोकळ्या होणाऱ्या सामजिक व राजकीय व्यवस्थेच्या मालकांना अजूनही पोलीस माणूस स्वतःस संपविण्याचे गांभीर्यच ध्यानी येतं नाही आहे.
प्रत्येक मृत्यू नंतर कागदावर काही शब्द ओढून त्याचे circular विभागात फिरवून आपली जबाबदारी पूर्ण झाल्याचे स्वतःलाच पटवून देत क्लिष्ट व असाध्य होऊ पहात असलेल्या रोगावर तात्पुरती मलमपट्टी करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न किती काळ पुढे येणाऱ्या मोठ्या सामजिक संकटाला थोपवू शकेल हा जघन्य प्रश्न कुणालाही पडत नसणे हेच या समाजाचे मोठे दुखणे आहे.
येथे हेतूत मागील काळात मोठ्याप्रमाणात वाढ झालेल्या पोलीस माणसाच्या आत्महत्येचे आकडे आम्ही देत नाही आहोत त्याच एकमेव कारण हे की आमच्या लेखी एक ही पोलीस माणसाची आत्महत्या ही समाजातील सामान्य माणसाच्या हृयासाचे कारण आहे. दुर्दैव हे की दिवसेंदिवस हा आकडा वाढतच जात आहे. वाईट हे की हे आत्महत्येचे प्रमाण केवळ कर्मचारी स्थरावरच मर्यादित नसून ज्यांना त्या रोखण्याची जबाबदारी दिली जाते व ज्यांच्यावर त्या रोखण्यासाठी उपाय योजना आखण्याचे दायित्व असते. ते वरिष्ठ अधिकारी ही आत्महत्येचे मार्ग निवडत आहे आणि हीच अतिशय गंभीर बाब आहे.
म्हणून या गंभीर सामाजिक समस्येचे उपाय शोधणे प्राधान्यक्रमाने अत्यावश्यक आहे. त्यासाठी आधी या समस्येची कारणे साकल्याने अभ्यासने आवश्यक आहे. ज्याचा छोटासा परंतु प्रामाणिक प्रयत्न the sapiens news ने केला आहे.
पोलीस माणसाच्या आत्महत्येची प्रमुख 11 कारणे

१ अपेक्षा भंग
जेव्हा एखादा सामन्य तरुण पोलीस विभागात भरती होतो तेव्हा त्याच्या मनात पोलीस विभागाची शान, रुबाब किवा क्रेझ म्हणूया. ही खूप मोठी असते. परंतु प्रत्येक्षात जेव्हा गणवेश परिधान करून तो समाजात जातो अथवा फिल्डमध्ये उतरतो तेव्हा मात्र त्याचा भ्रमनिरास होतो पोलीसांचे प्रमुख दुःख हे की त्यांना अधिकार तर भरपूर दिले आहे, परंतु कागदावरच जेव्हा समाजात किवा न्यायालयात तो उभा राहतो तेव्हा मात्र तो स्वतःस खूप मर्यादित, दुबळा व छोटा वाटायला लागतो. हे कुणाला विशेषतः पोलीस विभागातील काही व्यक्तींना पटणार नाही. परंतु हेच सत्य आहे. पोलीस स्वतःला नेहमी सुपर हिरो दाखवण्यासाठी प्रयत्नरत असतो आणि समाजही. त्यामुळे तो स्वतः आणि समाजही, तो एक हाडामासाचा व भावभावनांचा माणूस आहे हेच विसरतो.

२ विभागातील राजकारण
समाजात जसे विविध राजकीय सामजिक व जातीय गट तट असतात तसे पोलीस विभागातही असतात. येथे लॉबी सिस्टीम चालते प्रत्येकाची एक लॉबी असते. IPS ची तर प्रांतीय लॉबी असते. त्यात राजकीय नेत्यांच्या निकटवर्तीयांची ही मोठी लॉबी असते आणि ह्याच लॉबी महत्वाच्या पोस्टिंगसाठी प्रभावी ठरतात. राजकीय घटना क्रमानुसार यांच्या व प्रत्येक पोलीस व्यक्तीच्या प्रभावात चढ उतार असतो आणि एक व्यक्ती वा लॉबी कितीही प्रभावी असली तरी तिचा प्रभाव सर्व काळ नसतो कधी कधी नेहमी प्रभावात असलेल्या व्यक्तीला अडनगळीत ही पडण्याची वेळ येते. ही स्पर्धा व अडनगळीत पडणे खूप जीवघेणे असते.

३ सामाजिक उपेक्षा
सामजिक व राजकीय स्तरावर पोलीस नेहमी वापरला जातो काम असेल तेव्हा जवळ नाहीतर उपेक्षाच उपेक्षा. स्वार्थ पोसनारी सामाजिक व राजकीय व्यवस्था आपला स्वार्थ पूर्ण करण्यासाठी पोलीसाला जवळ करते. विरोधकांवर व समाजात प्रभाव पाडण्याचे प्रभावी हत्यार म्हणजे पोलीसांशी जवळीक, हे पोलीसाला ही माहीत असते की जवळ येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्यात 90% स्वार्थ घेऊन येणारे असतात. पोलीसांकडून काम करून घेण्यातही प्रभाव वाढतो आणि पोलीसाला कामाला लावण्याच्या कामात ही. हा समज वा गैरसमज आजही समाजात आहे.

४ कौटुंबिक प्रश्न
सक्षम कुटुंब कधी होते जेव्हा कुटुंबातील सर्व सुखदुःखात एकत्र येतात एकत्र लढतात, आनंद साजरे करतात, दुःख वाटून घेतात, सण व उत्सव, वाढदिवस एकत्र साजरे करतात आणि कुटूंब यानेच परिपूर्ण होते. स्नेह, भाव भावना, प्रेम हे कृतीतून दाखवावे ही लागते ते नुसते मनात ठेवून चालीत नाही आणि कृती करायची तर व्यक्ती त्यासाठी तेथे उपस्थित असावा लागतो. नेमके हेच पोलीस नौकरित साध्या होत नाही. जेव्हा समाजात शांतता असते तेव्हा ही ती कायम ठेवण्यासाठी पोलीस आवश्यक असतो, जेव्हा समाजात आनंद, सण, उत्सव साजरे केले जातात तेव्हा ही त्याची आवश्यकता असते. आणि जेव्हा समाजात काही समस्या उत्पन्न होते अराजक माजते तेव्हा तर पोलीस हवा हवासा वाटतो आणि या तीनही अवस्थेतून समाज निरंतर जात असतो. पण त्यात मात्र त्याच्या कुटुंबाचे दिवाळे वाजते. मुले कधी कशी मोठी होतात हे ही अनेकांना समजत नाही. पोलीस पत्नी ही दुसऱ्या कोणत्याही पेशातील व्यक्तीच्या पत्नी पेक्षा अधिक संयमित, सोशिक व आहे त्यात समाधान मानीत नवऱ्याला समाजासाठी देऊन स्वतः तिची नी त्याची जबाबदारी पेलते त्यात ती माऊली किती success होते हे तीच तिला व त्या पोलीस माणसालाच माहीत.

५ व्यसन
कोणी काही ही म्हणो पण कामातील समाधान नावाचा विषय पोलीस विभागात अनेकदा अनुपस्थित असतो. कारण एकच समान कामाला पोलीस माणसास बक्षीसही मिळू शकते व शिक्षाही, अनेकदा पोलीस नियमात काम करण्याचा कसोशीने प्रयत्न करतात, परंतु लोकशाहीचे डिजाईन असे झाले आहे की त्यात पोलीसांच्या हातात जनसामान्यानााच काय स्वतःलाही न्याय देणे दुरापास्त झाले आहे. दुर्दैव हे की होत, ते ते उधडपणे मांडू ही शकत नाही. घरापासून आप्तस्वकीयांपासून समाजापासून दूर जात जाणारा पोलीस अनेकदा व्यसनाला जवळ करतो. कारण पोलीसांची उपस्थिती हीच त्यांची ड्युटी असते. तासंतास एकच ठिकाणी उपस्थित राहून तो कंटाळतो व व्यसनाधीनतेस बळी पडतो. ज्याने त्याची प्रकृती व प्रतिष्ठा दोन्हींची पणाला लागतात.

६ सभोवतालचे नकारात्मक वातावरण
एखादा सदाचारी वारकरी जरी काही महिने चोर,दरोडेखोर, बलात्कारी, समाजकंटक यांच्यात ठेवला तरी काही दिवसात तो दुराचारी होईल. मग 30,35 वर्ष असल्याचं लोकांच्याशी deal करणारा सामान्य पोलीस माणूस तरी स्वतःस किती काळ असल्या वातावरणात physically and mentally sustained करू शकेल ? हा संशोधनाचा प्रश्न आहे. आरोपी गुन्हेगार चोर, खोटारडे, भांडखोर, दोन नंबरवाले लोकच तर पोलीस ठाण्यात जातात सामान्य माणूस शक्यतो जाणे टाळतो. पोलीस पेशात जेवढे विविध प्रकारचे नकारात्मक लोक भेटतात तेवढे एखाद्या जुगाराच्या व मद्याच्या अड्यावरही येत नसतील.
कारण पोलीस जुगाराच्या व मद्याच्या अड्यावर जावो ना जावो परंतु ते चालवणारा पोलीस ठाण्यात येतोच येतो. अशा वातावरणात प्रगतीचा विचार करणे सोडा सामान्य सरळ साधा विचार शाबूत ठेवणे ही दिव्य असते.

७ खात्यातील खो खो नी कब्बडी
माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार एकदा ठाणे येथील पोलीस क्रीडा स्पर्धात म्हणाले होते की पोलीस खात्यात फक्त दोनच खेळ चालतात. एक खो खो आणि दुसरा कब्बडी कोणास कोठून खो बसेल माहीत नाही आणि पाय खेचणे तर विभागाचा नियमच आहे. दुर्दैव हे की एका रात्री ते झोपले तेव्हा महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नव्हते त्यांना न सूचित करताच त्यापदावरून पायउतार केले गेले होते. जे त्यांना वृत्तपत्रात व वृत्तवाहिन्यांवर समजले. अखेर त्यांनी नौकरीचा राजीनामा दिला पण सर्वच अधिकारी एवढे स्वच्छ, स्वाभिमानी, सरळ आणि संपन्न नसतात. अनेकांच्या घरगुती आर्थिक अडचणी असतात. म्हणून ते अनेक खो खाऊन व पाय ओढले तरी विभागात तग धरून ठेवण्याचा जीवघेणा प्रयत्न करीत असतात पण त्यात किती यशस्वी होतात माहीत नाही हो पण आत्मसन्माची वाट जरूर लागते कधीकधी जीवनाची ही.

येथे एक किस्सा कथन करणे अतिशय आवश्यक आहे काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र पोलीस दलात दोन ADG होते त्याच्यात DGP होण्याची स्पर्धा होती. त्यातील एक होते पोलीस गृहनिर्माण विभागाचे इंचार्ज व दुसरे होते. राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख ACB चे जे प्रमुख होते ते गृहनिर्माणच्या ADG चे कुठे काही चुकते या संधीची वाट पाहत होते व त्यांना ती आपसूकच मिळाली गृह निर्मानच्या विभाग प्रमुखाच्या PA ने एका बिल्डरकडे लाच मागितली. त्याच्यावर ADG लाचलूचपत यांनी ट्रॅप लावला त्यात तो आणि ADG गृहनिर्माण अलगद अडकले. त्यांना अटक झाली आणि काहीच काळात रस्त्यातील काटा साफ झाल्याने SORRY केल्याने ADG लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख हे महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक (DGP) झाले. आत्ता आपला समज असेल हे स्वच्छ प्रतिमेचे व्यक्ती असेल परंतु तसे अजिबात नाही स्वता भारताचे माजी राजदूत, पंजाब पोलीसचे माजी DGP आणि अतिशय सन्मानीय IPS पोलीस अधिकारी तथा Bullet for bullet या बहुचर्चित पुस्तकाचे लेखक माननीय ज्युलियन रिबेरो साहेबांनी त्यांच्या याच पुस्तकात वरील अधिकाऱ्यावर समाजाशी देशाशी बांधिलकी नसल्याचे ताशेरे ओढले आहे तेही कुविख्यात Khalisthani terrorist भिंद्रेवालाच्या प्रकरणात

८ Me time चा अभाव
पोलीसाच्या जीवनात me time नावाचा प्रकार नसतोच नसतो. ज्या व्यक्तीला कुटुंबासाठी इच्छा असूनही वेळ देणे अशक्य असते. तो स्वतःला व स्वतःच्या आवडीनिवडीसाठी वेळ तरी कसा देऊ शकेल ?
Me time च meaninig होतं स्वतःच्या आनंदासाठी दिला जाणारा वेळ. जो फक्त त्या व्यक्तीचा असतो. ना त्याच्या कुटुंबाचा, ना नातेवाईकांचा ना मित्रांचा ना नौकरीचा प्रश्न हा आहे जो माणूस स्वतःचाच नसतो तो स्वतासाठी me time तरी कसा काढू शकेल हो ?

९ Appreciation पेक्षा Punishment अधिक.
तुम्हाला माहित आहे जेथे कौतुकाची शाब्बासकीच्या मायेने दिल्या जाणाऱ्या थापेची कमी असते. तेथे प्रगती missing असते. त्याहून वाईट हे की जेथे सामन्य काम करतांनाही काही चुकण्याची भीती असते तेथील नौकर तणावात काम करतो. त्याहून ही वाईट जेथे समाजसेवेपेक्षा व्यक्ती पूजेला व ती करणाऱ्यांना अधिक महत्व व ममत्व प्राप्त असते, त्यामुळे समाजाची वाट लागते. पोलीस विभागातील पोलीस माणूस भीक नको पण कुत्र आवर या उक्तीवर नौकरी करीत असतो. तो शाब्बासकी मिळविण्यापेक्षा शिक्षा नको मिळायला या विचारात जगतो.


१० आजार : आरोग्याचा अभाव
ड्युटीच्या अनियमित वेळा, व्यसन, अनिद्रा, नकारात्मक व असंवेदनशील वातावरण, सकस आहाराचा अभाव सुदृढते विरोधातील जीवनशैली, या सर्वांचा परिपाक म्हणजे विवीध आजार जसे हृदयरोग, मधुमेह, सांधेवात even क्षयरोग असले जघन्य आजार पोलीसाला असतात. जे आजार सामन्य माणसाला वृद्धापकाळात होतात ते आजार पोलीसास तरुण वा प्रौढ वयातच जडतात. दुर्दैवाने निवृत्ती नंतर फार काळ पोलीस माणूस पेंशन घेत नाही अर्थात लवकर जातो अथवा आजाराने जर्जर झालेला असतो.

सारांश
तशी अनेक कारणे देता येतील परंतु जी प्रखरतेने जाणवतात ज्याचा नकारात्मक प्रभाव पोलीस माणसाच्या जीवनावर मोठ्या प्रमाणात पडतो त्याची मांडणी आपल्या पुढे करण्याचा प्रयत्न येथे केला आहे.
सर्वात महत्वाचे पोलीस विभागातील व्यक्तीचा उल्लेख लेखात पोलीस माणूस म्हणून हेतूत केला आहे. त्याच कारण हे की पोलीस ना सुपरमॅन आहे, ना प्रभू राम, ना रावण तो एक साधा माणूस आहे, हो आणि माणूसच आहे. आपल्यासारखाच हाडामासाचा भावना व राग, लोभ, मोह, मत्सर असलेला माणूस. जो काही वेळा समाजाच्या नजरेत, काही वेळा वरिष्ठांच्या नजरेत, तर काही वेळा स्वतःच्या नजरेत चुकतो. पण अनेकदा बरोबर ही असतो. पण काही वेळा चुकण्याची शिक्षा समाज वा नियती याला अशी देते की त्याचा जगण्यावरचा विश्वास कमी होऊन मरण्यावरचा विश्वास अधिक घट्ट होतो. ज्यातून हे घडते.

संपादक : शिरीष प्रभाकर चव्हाण
The Sapiens News

Leave a Comment

Vote Here

Loading poll ...
Coming Soon
Do You Like Our Website?
UPSE Coaching

Recent Posts