धुळे : गट विम्याच्या बिलाची रक्कम शिंदखेडा उप कोषागार कार्यालयात पाठविण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या दोंडाईच्या येथील शाळेतील मुख्याध्यापिका अर्चना बापुराव जगताप हिस नाशिक परिक्षेत्रातील धुळे लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने लाच घेतांना रंगेहाथ पकडले आहे. दोंडाईचा येथील एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या मंजूर गट विम्याच्या बिलाची १,३३,४८४ रक्कम मिळण्यासाठी त्यांनी शासकीय आश्रम शाळा, अक्कलकोस येथील मुख्याध्यापिकेकडे अर्ज केला.
मात्र अर्ज करून देखील काम होत नसल्याने त्यांनी मुख्याध्यापिका अर्चना बापुराव जगताप यांच्याकडे विचारणा केली. मुख्याध्यापिका अर्चना जगताप यांनी संबंधित रक्कम मिळवून देण्यासाठी ५००० रुपये लाच मागितली. त्यामुळे तक्रारदार यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे या सदर्भात तक्रार केली. दि.१ जानेवारी रोजी तक्रारीची पडताळणी झाल्यावर धुळे एसीबीच्या पथकाने शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, अक्कलकोसच्या येथ सापळा रचला. या सापळ्यात मुख्याध्यापिका ४००० रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ सापडली.
या मुख्याध्यापीकेवर दोंडाईचा पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्ह्य दाखल करण्यात आला आहे. तपास धुळे एसीबी पोलीस निरिक्षक रूपाली खांडवी करत आहेत. सदर कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षिका शर्मिष्ठा वालावलकर- घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली धुळे धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील, पोलीस निरिक्षक रूपाली खांडवी, पथकातील कर्मचारी राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागूल, मकरंद पाटील, प्रविण मोरे, प्रविण पाटील, सुधीर गोरे, जगदीश बडगुजर या पथकाने ही कारवाई केली आहे
संपादक : The Sapiens News
(संबंधित छायाचित्र हे महाराष्ट्र टाईम्सच्या माध्यमातून उपलब्ध झाले आहे.)