त्रिमूर्ती चौक नाशिक :- सामन्य भाजीविक्रेत्या पालकांच्या लेकीचे charted accountant परीक्षेत घवघवीत यश संपादन.
विद्या विजय बडगुजर असे या विद्यार्थिनीचे नाव असून तीचे शालेय शिक्षण कोणत्याही नामांकित अथवा बडेजाव असलेल्या शिक्षण संस्थेत शिक्षण न होता नाशिक महानगरपालिकेच्या शाळेत झाले तरी देखील तिने सीए फायनल परीक्षेत लागलेल्या निकालात उत्कृष्ट यश संपादन केले. ती नाशिक विभागात मुलींमध्ये सीए फायनल द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. सीए फायनलचे दोन्ही गट तिने एकाच वेळेस पास केले.
विद्या सीए फाउंडेशन परीक्षेत ही संपूर्ण नाशिकमध्ये पहिली आलेली व इंटरमिजिएट परीक्षा सुद्धा पहिल्याच प्रयत्नात दोन्ही ग्रुप उत्तीर्ण करण्याचा मान मिळवला होता. इयत्ता दहावी मध्ये 97 % गुण मिळवून ती शाळेत ही प्रथम होती व इयत्ता बारावीत अकाउंट व गणित विषयात 99 टक्के गुण मिळवून कॉलेजमध्ये प्रथम होती.
तिला अकरावी वाणिज्य पासून प्रा. सीए लोकेश पारख यांचे मार्गदर्शन लाभले. तिचे आई वडील त्रिमूर्ती चौक येथे भाजीपाला विक्रीचे काम करतात.
विद्या बडगुजर हिने मिळवलेल्या यशाबद्दल बोलताना तिचे मार्गदर्शक लोकेश पारख म्हणाले की, विद्याने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेले यश सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. मनात जिद्द असेल व योग्य मार्गदर्शन घेतले तर प्रतिकूल परिस्थितीत देखील यश मिळवता येते .