“निरोगी आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली“
“जिथे कमी तेथे आम्ही “ या उक्तीवर चालणाऱ्या नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक यांच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने
नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक व गोखले एज्युकेशन सोसायटीचे सर डॉ. मो. स. गोसावी भौतिकोपचार महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत
फिजिओथेरपी तपासणी व त्यावरील उपचाराचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. बरेचसे आजार असे आहेत जे औषधाविना व नशस्त्रक्रिया करता व्यायामाद्वारे सुद्धा बरे होऊ शकतात यासाठी फिजिओथेरपी ही सोपी व आधुनिक उपचार पद्धती खूप फायदेशीर ठरते. शिबिरात 100 हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली व त्यांना फिजिओथेरपी विषय मार्गदर्शन करण्यात आले. डॉ राकेश जाधव( प्रिन्सिपल इन्चार्ज) डॉ अर्चना बोधले ,( असोसिएट प्रोफेसर) डॉ श्रद्धा कोठावळे, डॉ प्रियंका अहिरे (असिस्टंट प्रोफेसर) यांनी रुग्णांची तपासणी व त्यावर मार्गदर्शन केले.
नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ स्नेहल देव यांनी सगळ्यांचे आभार मानले . शिबिरास खालील मान्यवरांची उपस्थिती लाभली अजय बोरस्ते , साहेबराव पाटील ,एडवोकेट उज्वला पाटील, महावीर इंटरनॅशनल चे अनिल नाहर ,राजेंद्र डुंगरवाल ,अनिल बाफना ,लाफ्टर योगाचे संजय सोनार ,राजेंद्र पवार ,विजय शिरसाठ ,रोहित पारख अर्थकला फायनान्शियल चे संदीप महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम पार पडण्यासाठी, राजेंद्र गुप्ते,नमस्ते नाशिक फाउंडेशनचे खजिनदार संदिप देव, यांनी विशेष परिश्रम घेतले