शरद पवारांवर आरोप खूप झाले पण सिद्ध एकही झाला नाही हे त्यांचे चातुर्य की स्वच्छ व्यक्तिमत्व ? हा संशोधनाचा विषय आहे.
हो हा प्रश्नच आहे आणि तो महाराष्ट्राचे वरीष्ठ नेते आणि राजकारणातील चाणक्य समजल्या जाणारे शरद पवार यांना प्रत्येक महाराष्ट्रीय व श्री शिव छत्रपती प्रेमी विचारू पाहत आहे. शरद पवार तसे सुजाण राजकारणी त्यांना एकाच वेळी सकारात्मक व नकारात्मकतेणे पाहणारी मंडळी आहेत. त्यांचा मान राखणारी व सन्मान करणाऱ्यांची संख्या ही कमी नाही. आजही बहुसंख्य लोक त्यांना पूजतात व काही तिरस्कारही करतात जशी अनेक चांगल्या कामासाठी लोक त्यांचं नाव घेतात तसेच त्यांच्यावर याच महाराष्ट्रात आरोपही अनेक झाले आहेत.
दाऊदला मोठे करण्यापासून ते तेलगी पर्यंत ते मुबंई बॉम्ब स्फोटातील आरोपींकडे हेतूत दुर्लक्ष केल्याचे ही आरोप त्यांच्यावर आहेत. त्यांच्यावर सर्वात मोठा आरोप हा आहे की ते विश्वासार्हय नाहीत. पक्ष फोडण्या पासून ते घर फोडण्या पर्यंत त्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. परंतु अखंड महाराष्ट्रात एकछत्री अधिराज्य गाजविणारे नेता म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते त्यांचा कोण किती आदर करतो माहीत नाही पण विरोधकांबरोबरच जवळच्यांच्यात ही त्यांची दहशत कमालीची आहे, होती असेन त्याच एकमेव कारण हे की त्यांचं राजकारण कुणालाच कळलं नाही कदाचित कळणार ही नाही.
त्यांच्या सामर्थ्याची शक्ती किती मोठी होती याची प्रचिती देणारं एकच उदाहरण येथे देणं पूर होईल.
एक काळ होता २००४ ते २०१४ या काळात भारतात सर्वात प्रभावशाली महिलाच नाही तर व्यक्ती ही सोनिया गांधी यांच नाव, दबदबा, दरारा होता. पक्षातच काय विरोधक ही त्यांना वाकडे जात नसतं. LTTE सारखी अतिशय बलाढ्य संघटना, तीचा नेता अतिशय शांतपणे चावून खाणारी व प्रभाकरण याच्या मृत्यशी अप्रत्यक्ष संबंध असणारी, जगभरात ज्या माफियांचा खोप आहे अशा माफियांचे अप्रत्यक्ष पाठबळ असणारी सर्वात प्रभावीशाली महिला म्हणून ज्यांचे नाव घेतल्या जाई अशा गांधी घराण्याच्या सुनेला तिचे परदेशी नागरिकत्व स्विकारित नाही आणि आदेशही अशा प्रखर मुद्यांवर काँगेस पक्षातून बाहेर पडलेल्या पवारांना सोनिया गांधी राजकारणातून कधीच उध्वस्त करू शकल्या नाही. एवढे सुदैवीने काँगेस मधून फुटून बाहेर पडलेले इतर नेते ठरले नाही. ज्यांची list खूप मोठी आहे. एवढेच नाही तर फुटून नवीन पक्ष काढून पुन्हा सत्तेत येत एका पक्षाचा पक्ष प्रमुख होत काँगेस पक्षाशीच युती बांधत सोनियांच्या शेजारी मानाने बसत सत्तेची वाटाघाटी करणारा शरद पवार हे कदाचित एकमेव नेता असावे.
आजही लालकृष्ण अडवाणी यांचं नाजाईज सरकार म्हणूनच वक्तव्य केल्याने सोनिया गांधींनी त्यांना हात जोडून माफी मागायला लावली होती जी त्यांनी मागितली हो पण ह्या राजकारणातील दिग्गज महिलेला पवारांना काही नमवता आले नाही. किंबहुना त्यांचीच मदत घेत त्या अनेकदा राज्यात व राष्ट्रात ही अधिक भक्कम झाल्या.
पवारांबद्दल जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे हा भारतातील असा एकमेव नेता असेल ज्याच्या मनाचा थाव कुणाला ही लागला नाही विरोधक जिंकल्यावर ही त्याच्या मनात धास्ती व धाकधूक कायम ठेवणारा नेता म्हणजे शरद पवार.
परंतु येथे एक तक्रार मांडणे ही आवश्यक आहे जी प्रश्न स्वरूपात आहे.
५ तासा नी २३३च्या प्रवासाला ४० वर्ष का ? हो आहे प्रश्न आहे पण त्यात एक खंत, राग, संताप, दुःख ही आहे जे कायम विधायक कायदेशीर संविधानिक अधिकाराच्या कक्षेत राहून व्यक्ती करण्याचा प्रयत्न असेल. आपण असे जरी गृहीत धरले की विरोधक पवार ४० वर्षानंतर रायगडावर गेल्याच्या मुद्द्याचे राजकीय भांडवल करीत आहे तरी देखील मंदिरात जायला ४० वर्ष लागणे तेही एका राज्याच्या माझी मुख्यमंत्र्याला देशाच्या संरक्षणमंत्र्याला महाराष्ट्रात व महाराजांच्या जातीत जन्मलेल्या एका दिग्गज नेत्याला ज्याला दोन पावले चालायला ही हेलिकॉप्टर आलिशान गाड्या गाड्या व मोठा फौजफाटा उपलब्ध आहे. ना तो आजारी अपंग ना अंध आहे आणि जरी असता तरी इतर अपंग अंध आजारी बांधव छत्रपतींच्या चरणी अतीव कष्ट वेचित उन वारा पावसची ही तमा न बाळगता नतमस्तक होतात तसे यांना ही होता आले असतेच की
सर्वच जाती धर्माचे दैवत असलेल्या महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी कदाचित ते पक्षाची घराची जवळच्या माणसांची साथ सोडण्याची तुतारी पक्षचिन्ह मिळण्याची वाट पाहत होते का ? असा प्रश्न येथे खेदाने विचारावासा वाटतो रायगड ते बारामती २३४ किमीचे अंतर १४७७ किमी असलेल्या दिल्लीच्या अंतरापेक्षा अधिक दूर आहे का ?कदाचित तो डोंगदऱ्यांचा प्रदेश आहे म्हणून का ते गेले नाहीत ?
एवढी राजकारणातील समीकरणे मोडण्याची दक्षता तर ब्रिटिशांनी ही घेतली नसेल नाही का ? येथे एकच लिहावंसं वाटतं. छत्रपतींच्या चरणी नितांत श्रद्धा असती तर कदाचित त्यांना एकवेळ जेष्ठ, मुरब्बी, चाणक्य, राजकारणी ह्या उपाधी मिळाल्या नसत्या, पण एक महान थोर विश्वासाहर्या राजकारणी म्हणून या मातीने नेहमी लक्षात ठेवले असते. सत्ता व राजकारण असल्या क्षुल्लक गोष्टीसाठी तरी शरद पवारांनीच काय कुणाही राजकारण्यानी या मानवतेच्या राजाचे भांडवल करू नये हीच अपेक्षा आणि पवारांचेच म्हणायचे झाले तर आज त्यांच्यावर जी वेळ आली आहे जीने पक्ष, आप्तस्वकीय, नातेसंबंध ही मोडकळीस आले ती कुणा ही राजकारण्यावरच काय व्यक्तीवर ही येऊ नये व या जीवनाच्या संध्येस पवार हे या सर्व संकटातुन मुक्त होवो ही च श्री शिव छत्रपती चरणी.
संपादक
शिरीष प्रभाकर चव्हाण