वर छायाचित्रात असलेले जे साधू आहेत हट योगी अनेक वर्षांपासून हे आपल्या डोक्यावर केसात रोपटे लावून शेतजमीन वा माती खते टाकून अस्वच्छ प्रदूषित न करण्याचा संदेश देत आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार पिकांना रासायनिक खतांची अजिबात गरज नाही. पिके हे खतांच्या विना ही येऊ शकतात. जर ती माझ्या डोक्यांवरील केसात विना खतांची येवू शकतात तर जमिनीत ही येऊच शकता त्यासाठी रासायनिक खते वापरून जमीन माती प्रदूषित करण्याची काहीच गरज नाही.
त्यांना पत्रकाराने विचारले की या रोपट्याचा तुम्हाला काही त्रास होतो का तर ते म्हणाले हो होतो ते डोक्यांवरील कातडीत जातात आणि जखमा करतात अनेकदा दुखते ही खुप पण मी हे सगळं सामजिक कार्यासाठी करतो आहे.
हा व्हिडीओ जी शूट केलेला नाही आणि व्हिडिओत असलेले पत्रकार ही आमचे प्रतिनिधी नाही. पण हा व्हिडीओ यांच्या सौजन्याने समाज माध्यामातून प्राप्त केला आहे