चिट्ठी आई है आई है…, ना कजरे की धार ना मोतियों के हार…. आज फिर तुम पे प्यार आया है…, चाँदी जैसा रंग है तेरा सोने जैसे बाल… ही गाणी आठवताय नक्कीच आठवणार कारण या गाण्याचे शब्द व तो अतिशय सुंदर मनाला खोलवर भिडणारा आवाज आपल्या सर्वांना प्रिय होतात आणि तो आवाज होता ख्यातनाम गजल हायक पंकज उधास यांचा ‘नाम’ चित्रपटातील त्यांचं गाणं चिट्ठी आई है आई है… आजही डोळे पाणावून जाते. आजही आपले डोळे पाणावतील अशीच बातमी आली आहे या सुंदर व मर्मभेदी गाण्याचे गायक पंकजजी आपल्यात नाही राहिले. त्यांना देवआज्ञा झाल्याची बातमी प्रसार माध्यमांना त्यांच्या कन्या नायब उधास यांनी दिली आहे.
अनेक वर्षांपासून त्यांना प्रादिर्घ आजाराने ग्रासले होते. त्यातच त्यांचं आज निधन झालं. ते ७२ वर्षांचे होते.
