पर्यावरणवादी तथा शिक्षणतज्ञ सोनम वांगचूक हे लद्दाखमध्ये तेथील नागरिकांच्या लोकशाही निगडित अधिकारासाठी उपोषणाला बसले आहे. त्यांनी भारत सरकारशी त्यांची चर्चा निषफळ झाल्याने हे पाऊल उचलले आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार भारतीय जनता पक्षाने त्यांना आश्वासन दिले होते की लद्दाखचा समावेश ६ शेड्युलमध्ये करू, ज्या योगे तेथील नागरिकांना विशेषाधिकार मिळतील तसेच तेथील पर्यावरणाचे देखील रक्षण होईल व त्याला कायद्याचे स्वरूप व संरक्षण मिळेल. परंतु अद्याप पावेतो त्यांना तो अधिकार ही मिळाला नाही व तेथील जनतेला मतदानही करता येणार नाही आहे, याच संविधानिक अधिकारासाठी ते हा लढा उपोषणाच्या मार्गाने करीत आहे.
-१५℅ तापमानात ते आणि लद्दाखचे नागरिक उपोषणाला बसले आहे. त्यांनी भारतीय जनतेला त्यांच्या या लढ्याला समर्थन देऊन त्यांचा आवाज केंद्र सरकारपुढे नेण्यास मदत करण्याचे आवाहन केले आहे.