पुणे : दुहेरी ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्तीगिर शिवराज राक्षे यांना बुधवारी क्रीडा विभागात थेट नियुक्तीचे पत्र देण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर मागील सहा-सात वर्षांपासून अडणंगळीत पडलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या थेट नियुक्तीच्या प्रश्नावरून महाराष्ट्रातील खेळाडूंमध्ये पुन्हा एकदा संताप व्यक्त केला जात आहे. खेळाडूंच्या नोकरीतही सरकारची वशिलेबाजी स्पष्टपणे दिसत असल्याने ही खदखद व असंतोष आहे. ‘शिवराज राक्षेला नोकरी विषयी कुणाचा आक्षेप अजिबात नाहीये. मात्र, आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, मग आमच्या नियुक्तीच्या प्रश्नांचं काय ?’ असा उद्विग्न प्रश्न नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या खेळाडूंनी शासनाला केला आहे.
कुस्तीपटू शिवराज राक्षेला राज्य शासनाच्या थेट शासकीय सेवानियुक्ती योजनेतून जिल्हा क्रीडा अधिकारी (DSO) पदावरील नियुक्तीचे पत्र स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. या घटनेनंतर खेळाडूवर्गात तीव्र नाराजी उमटली. अनेक आंतरराष्ट्रीय पदकविजेते खेळाडू अनेक वर्षांपासून थेट नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, दुसरीकडे सर्व नियम व अटी डावलून एकाच खेळाडूला त वशिलेबाजीने नोकरीत देण्याची पद्धत कशी योग्य आहे?’ हा सवाल आता हे खेळाडू शासनास विचारीत आहे.
यांच्या या प्रश्नाकडे शिंदे सरकार किती संवेदनशीलतेने पहाटे हे लवकरच कळेल.