सविस्तर वृत्त असे की तलाठी विजय राजेंद्र जाधव वय 33 सज्जा शिंगवे अतिरिक्त कार्यभार कुंदलगाव ता. चांदवड जि. नाशिक यास दहा हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
तक्रारकर्ते यांच्या आई, मामा तसेच मामांच्या मुली व मावशी यांनी कुंदलगाव ता. चांदवड येथील शेती वाटपासाठी निफाड दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता.
न्यायालयात त्यांचात तडजोड होऊन कोर्टाच्या आदेशानुसार कुंदलगाव ता चांदवड येथील गट नंबर 410, 412, 414 या गटातील 50-50 गुंठे शेत जमीनीवर तक्रारकर्त्यांच्या आई तसेच त्यांचे मामा व इतर नातेवाईक यांच्या नावांची सातबाऱ्याला दुरुस्ती नोंद घेण्यासाठी व इतर महसूल रेकॉर्डवर नावे लावण्यासाठी तहसीलदार चांदवड यांचे कडे अर्ज केला होता.
तो अर्ज पुढील कार्यवाहीसाठी मंडल अधिकारी यांचे मार्फत तलाठी विजय जाधव यांच्याकडे देण्यात आला होता. याच कामासाठी जाधव यांनी तक्रारकर्त्याकडे 15000 रुपयांची लाच मागितली. त्यात तडजोड होऊन 10 हजारांची लाच देण्याचे ठरले त्यात त्याना रंगेहाथ पकडण्यात आले.
माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक विश्वजीत जाधव, पो. ह. प्रणय इंगळे, पो कॉ अनिल गांगुर्डे, चालक पो ह विनोद पवार यांनी केली.