नांदूर नाका हॉटेल मिर्ची परिसरातील यमुना अपर्टमेंटमध्ये बुधवारी ही चोरी योगेंद्र शर्मा यांच्या घरी झाली यात चोरांनी किमान ३५००० रुपयांचे दागिने लांबवली घरचे कदिकांडा व लॉक तोडून चोरट्याने ही चोरी केली. या परिसरात सध्या चोरीचे प्रमाण खूप वाढले असून दिवसा ढवळ्या असे प्रकार होणे हे पोलीस यंत्रणेला आव्हान आहे असे जाणवते. या बाबत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
योगेंद्र कुमार सुरेशचंद्र शर्मा (रा.यमुना अपा.मिरची हॉटेल मागे,पंचवटी) यांनी याबाबत फिर्याद दिली असून. शर्मा कुटूंबिय बुधवारी काही कामानिमित्त घराबाहेर पडले होते तेव्हा ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेले सुमारे ३५००० रूपये किमतीची दागिणी चोरली. अधिक तपास हवालदार राजुळे करीत आहेत.
दि सेपिअन्स न्युज