ACB च्या जाळ्यात अडकला पण रक्कम सोडवेना
अकोला ,अकोट : ही लाचखोरीची घटना घडली आहे अकोला येथे. API राहुल दरेकर यांच्याकडे एक प्रकरण आलं जे आरोपींना अटकपूर्व जामीन आणि त्यांच्या बाजूने चार्जशीट तयार करण्याचं होत. अर्थात आरोपींच्या बाजीने बेकायदा सहाय्य करण्याचं. त्या मोबदल्यात दरेकर याने दिड लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडी अंती ती एक लाख पंचवीस हजारावर आली.
त्याच दरम्यान आरोपी यांनी ACB शी संपर्क साधला व ACB ते ट्रॅप ही लावला जेव्हा आरोपी यांच्याकडून राहुल दरेकरने लाच स्वीकारली तेव्हा त्याला तो ACB च्या सापळ्यात अडकतो आहे याचा संशय आला आणि त्याने तात्काळ तेथून धूम ठोकली ती लाचेची रक्कम घेऊन आपल्या चारचाकी वरून. सध्या हे महाशय फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
या घटनेनं अकोला पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.सद्यस्थितीत अकोला आणि अमरावती एसीबीचे अधिकारी एपीआय राहुल देवकर यांच्या शोधात असून ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे.
आता या प्रकरणात अकोट शहर पोलीसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशी माहिती एसीबीचे अधिकारी मांजरे यांनी दिली आहे