नाशिक महानगरपालिका जलतरण तलावांची शोकांतिका
नाशिक मनपा : सध्या नाशिक महानगरपालिकेचे तरणतलाव सातस्त्याने वादाच्या भवऱ्यात अडकत असून येथील प्रमुख समस्या व त्याचे उपाय या अनुषंगाने याकडे दि. सेलियन्स न्युज पाहण्याचा एक सकारात्मक प्रयत्न करीत आहे. त्याचाच हा लेखाजोखा.
समस्या
१ परिसर व बाथरूमची अस्वच्छता : महानगरपालिकेच्या तलावावर प्रामुख्याने उन्हाळ्यात गर्दी होते. ज्याला येथील स्टाफ सिजन म्हणतो. या सिजनमध्ये येथे उपलब्ध स्वच्छता गृहे ही खरोखरीच अपुरी पडतात. ऑफसिजनला सर्व बॅच मिळून जे सभासद येतात त्यापेक्षा ही कितीतरी अधिक सभासद हे उन्हाळ्यात एका बॅचला गर्दी करतात. त्यात ऑफ सिजनच्या तुलनेतच येथे इतर कर्मचाऱ्यांच्या प्रमाणेच स्वच्छता कर्मचारी संख्या अतिशय कमी असल्याने स्वच्छतेचा मोठा प्रश्न उभा राहतो. त्यात भरीस भर काही सभासद अतिशय गलिच्छ वर्तन करतात ज्यात शॉवर न घेणे, परिसरात थुंकणे, संडासमध्ये फ्लॅश न करणे शॉवर व इतर साहित्य चोरने असले प्रकार करतात. यांची संख्या कमी असली तरी त्यांच्या वर्तनाचा परिणाम हा तलावाच्या सभासद, व्यवस्थापण, कर्मचारी व स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात होतो. दुर्दैव हे की त्यांना शिस्त लावणे वा नियम सांगणे हा देखील तेथील कर्मचाऱ्यांच्यासाठी वादाचा वा जोखमीचा व्यवहार होतो.
२ अपुरी कर्मचारी संख्या : नाशिक मध्ये १९९४ साली महानगरपालिकेचा नाशिक येथील तरणतलाव जनतेसाठी खुला करण्यात आला. तेव्हा नाशिकची लोकसंख्या जी होती त्यात आज किमान १० पट भर पडली आहे १९८४-९४ मध्ये जेवढे लोक जलतरण तलावावर जलतरणासाठी येत आज त्यापेक्षा १० पट जास्त लोक येतात आणि तेही नाशिक येथील सावरकर तलावालाच अधिक पसंती देतात. त्याच बरोबर नाशिकरोड सातपूर व सिडको व आडगाव नाका येथील तलावावरही प्रचंड गर्दी असते. परंतु काळानुरूप गर्दी वाढत जरी असली तरी अनेक कर्मचारी निवृत्त होऊनही येथे आजच्या सभासदांच्या तुलनेतच काय तर पूर्वी एवढा स्टाफ देखील भरण्यात आलेला नाही. विशेष हे की आजही महानगरपालिजेच्या अस्थापणेवर जलतरण तलाव संबंधित जागा रिक्त आहेत.
३ जीवरक्षक : आज मनपाचे एकूण ५ तलाव असून यातील आडगावनाक येथील स्व.मीनाताई ठाकरे तलाव वगळता उर्वरित चार तलाव महानगरपालिका स्वता चालवते. परंतु येथे व महानगरपालकेच्या आस्थापणेवर जीवरक्षकांची रिक्तपदे असून ही त्यावर अनेक वर्षांपासून भरती झालेली आणि सर्वात वाईट हे की २००३ ला जे मानधनीत कर्मचारी जिम प्रशिक्षक म्हणून काम करीत होते व त्यांच्यातील बहुसंख्य कर्मचाऱ्यांकडे संबंधित कामाची अहर्ता असूनही त्यांना जीवरक्षकांच्या कामाचा कोणताही अनुभव प्रशिक्षण अथवा प्राविण्य नसतांना ही जीवरक्षकाच्या ऑर्डर देण्यात आल्या. त्यांनी अनेक स्तरावर न्याय मागण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना न्याय मिळाला नाही आजही यातील व्यायाम शास्त्रातील उत्कृष्ट प्राविण्य असलेले कर्मचारी त्यांना त्यांच्या योग्यतेने जिमप्रशिक्षकांची ऑर्डर मिळावी यासाठी प्रतीक्षेत आहेत. ते आज जरी जिम व इतर ठिकाणी कर्तव्य बजावीत असले तरी त्यांचे पद व वेतन हे जीवरक्षक पदाचेच आहे. दुर्दैव हे की असल्या सावळ्या गोंधळामुळे कुशल व अहर्ता धारक शरीरसौष्ठव खेळाडूंना त्यांचे उचित पद तर मिळाले नाहीच परंतु जलतरणाचे अतिशय उत्कृष्ट खेळाडू जलतरण तलावाच्या प्रशिक्षक व जीवरक्षकपदासाठी प्रतीक्षेत आहेत. वाईट हे की जलतरण तलावासंबंधीत जीवरक्षक हे पद अतिशय आवश्यक व सभासदांच्या जीव रक्षणासंबंधी महत्वाचे असून ही यावर कायम स्वरूपी नियुक्ती अगदी रिक्तपदे असूनही झालेली नाही. हा केवळ या पदाची प्रतिक्षा असलेल्या खेळाडूंवर अन्याय नसून महानगरपालिका नाशिककारांच्या जीवाशी देखील खेळ करते आहे. आजवर स्वा. सावरकर तलावावरच १० पेक्षा अधिक सभासद, नाशिककर पाण्यात बुडवून मृत पावले आहे.
४ प्रशिक्षकांचा ही अभाव : नाशिक, नाशिकरोड सिडको येथील तलावावर केवळ एक एकच जलनिर्देशक असून त्यांना ही जलतरण तलाव व्यवस्थापकाचे पद व काम देण्यात आल्याने सभासद संख्येच्या मानाने येथे प्रशिक्षक म्हणून कुणी ही नसल्याचे चित्र पहावयास मिळते दुर्दैव हे की सातपूर जलतरण तलावावर तर ते ही नाही.
५ केवळ जनतेची फसवणूक आणि जीवाशी खेळ : नाशिक महानगरपालिकेने आपल्या नाशिककारांना जलतरण तलाव तर बांधून दिले परंतु तेथे ना स्वच्छता ना त्यांच्या जीवीताचे रक्षण परंतु प्रत्येक वर्षी १०% फी वाढ मात्र केलीच केली जाते. अनेक तक्रारी होतात परंतु त्याचा काहीही उपयोग होत नाही ना सुधारणा होते ना उत्पन्नात वाढ.
उपाय
प्रश्न हा आहे की यात सुधारणेला व उत्पन्न वाढीला वाव आहे का ?
या प्रश्नाचे उत्तर नक्कीच हो आहे. परंतु त्या आधी या सर्व जलतरण तलावाची पार्श्वभूमी पाहणे गरजेचे आहे.
अनेक वर्षांपासून जलतरण तलावाचे उत्पन्न काहीच नाही आणि तलाव घाट्यात जात असल्याचे चित्र रंगवले जात आहे. परंतु ही जरी वस्तुस्थिती असली तरी ती कृत्रिमरित्या तयार करण्यात आली आहे. यासाठी तलावाचे उत्पन्न व त्याच तलावावर उन्हाळी प्रशिक्षण शिबिर ठेके असलेले ठेकेदार कसे तुपात आहेत आणि त्यांना कसे ते ठेके चालवणे परवडते हे पहा. Practice batch swimming व coaching camp (जलतरण तलाव भाषेतील परवलीचे शब्द असल्याने तसेच देत आहे) चालवणारे ठेकेदार हा अडीच महिन्यात जे उत्पन्न कमावतो तेवढे उत्पन्न वर्षभरात चारही पुलचे ही नसते. हा झाला सरळ नफा त्यात अनेक पळवाटा ही आहेत जर त्या शोधल्या तर ह्याच उत्पन्नाचे आकडे डोळे विस्फाटणारे असेल. त्यात जलतरण साहित्य विक्रीचेच आकडे लाखोंच्या घरात आहे. मागील लिलाव पाहिला तर हे लक्षात येईल. परंतु जेथे कुपंच शेत खाते तेथे बाहेरच्यांना काय दोष द्यायचा ?
आज नाशिकची एवढी लोकसंख्या असूनही जर जलतरण तलावासारख्या tool मधून महानगरपालिकेला उत्पन्न काढता न येणे व pool तोट्यात चालले दाखवणे कितपत सत्य वाटते हे नागरिकांनीच ठरवावे ? ज्या पालिका अधिकाऱ्यांना जर सभासदांच्या जीवाशी प्रत्यक्ष संबंध असलेले जीवरक्षक पद कायम स्वरूपी नियुक्तीने भरणे अधिक अत्यावश्यक असल्याचे ही १० वर सभासदांचे पर्यायाने नाशिककरांचे जीव गमावल्या नंतरही उमजत नसेल तर त्याला काय म्हणावे ? तलावावर असुविधा, अस्वच्छता, अपुरा स्टाफ निर्माण करून तलाव ठेकेदारांच्या घस्यात घालण्याचा हा खूप मोठा बनाव असून या पाठीमागे कुणाचे षडयंत्र आहे याचा आधी शोध घेणे आवश्यक आहे. ज्या महानगरपालिकेच्याच तलावावर NIS, जलतरणातील अतिउच्च दर्जाचे खेळाडू व प्रशिक्षक असतांना ही जर तलाव तोट्यात व सुविधांच्या अभावात राहत असेल तर यातून एक नी एकच अर्थ निघतो तेथील तज्ञ अधिकारी व कर्मचारी यांचे मत ध्यानी घेतले जात नाही व ती इच्छाशक्ती वरिष्ठांच्यात नाही आणि त्याचे एक आणि एकच कारण हे की या सर्व तलावावर कुणाचा तरी दृष्ट डोळा आहे. आधीच प्रशिक्षण शिबीर व प्रॅक्टिस बॅच स्वता आपल्या निष्णात कर्मचाऱ्यांच्या मार्फत न चालवून महानगरपालिकेने आपला उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत बंद केला आहे. त्यात उगाच अनावश्यक कामे काढून तलाव तोट्यात व सुविधा विरहित दाखवीण्याचे व त्याची गावभर नामुश्की करून कुणाच्या तरी घशात घालण्याचे काम पूर्वी पासून करण्याचा प्रयत्नच नाही तर कावा केला जात आहे काही वर्षांपूर्वी हा छद्मी कावा येथील सभासदांनी हाणून पाडला होता जो आज परत डोके वर काढण्याचा धोका आहे. महानगरपालीकेने जर त्यांच्या अतिशय उच्च जलतरण पदवी असलेल्या कर्मचाऱ्यांनाचा swimming coaching camp व practice batch चे उत्पन्न विभागून दिले. तर हे सर्व तलाव नफ्यातच नाही तर उत्कृष्टतेत ही अव्वल असतील. सध्या आलेले तरण तलाव व्यवस्थापक यांनी हे ध्यानी घेऊन यावर एक आराखडा तयार करून तो वरिष्ठांना सादर करावा आम्हाला विश्वास आहे त्यांच्या प्रभावशाली नेतृत्वात हे शक्य होईल.
टीप : तलाव नफ्यात व सुविधांनी परिपूर्ण केवळ आणि केवळ येथील स्टाफच आनु शकेल फक्त त्यांना विश्वासात घेऊन व त्यांना यथोचित पाठींबा व प्रोत्साहन देऊन व बाहेरील स्वार्थ बुद्धीला थोडे दूर करूनच हे शक्य होईल. इच्छाशक्ती असेल तर तलावच काय शहारही स्वच्छ सुंदर होईल
शिरीष प्रभाकर चव्हाण
संपादक : दि. सेपिअन्स न्युज
संपादक हे स्वतः जलतरणातील NIS डिप्लोमाधारक राष्ट्रीय प्रशिक्षक व क्रीडा लेखक आहेत. तसेच त्यांना जलतरण क्षेत्राचा ४० वर्षांचा अनुभव आहे.