The Sapiens News

The Sapiens News

उपनगर पोलीसांची कारवाही : पारख,कटारिया यांच्या बंगल्यावर छापा ! फसवणुकीच्या गुन्ह्यात घरझडती

बातमी जशीच्यातशी : सकाळ वृत्तसेवा यांचे सौजन्य

Nashik Fraud Crime News : नाशिकरोड परिसरातील ‘डेस्टिनेशन वन’ या प्रकल्पातील गुंतवणूकीत फसवणूक केल्याप्रकरणी एमपीआयडीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेले ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक अशोक कटारिया यांच्या गंगापूर रोड परिसरातील बंगल्यावर उपनगर पोलिसांनी छापा टाकला असून रात्री उशिरापर्यंत घरझडती सुरू होती. त्याचप्रमाणे, सतिश पारख यांच्याही घरावर पोलिसांनी छापा टाकला आहे. यासंदर्भात पोलिसांच्या हाती महत्त्वाची कागदपत्रे हाती लागल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. (Nashik Kataria Parakh bungalow raided upanagar police action

संशयित नरेश जगुमल कारडा, मनोहर जगुमल कारडा, अशोक मोतीलाल कटारीया, सतीश धोंडुलाल पारख, अनुप सुभाषचंद्र कटारीया यासह संचालकांविरोधात उपनगर पोलिसात एमपीआयडी कलमान्वये गुन्हा दाखल आहे. याच गुन्ह्याच्या तपासाकामी ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक अशोक कटारिया यांना उपनगर पोलिसांनी नोटीस बजावून बोलाविले होते. वारंवार संपर्क साधून त्यांना चौकशीसाठी बोलाविल्यानंतरही ते पोलीस ठाण्यात चौकशीला हजर राहिलेले नाहीत.

पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या आदेशान्वये उपनगर पोलिसांनी गंगापूर रोड परिसरातील सुयोजित गार्डन येथे असलेल्या अशोक कटारिया यांच्या ‘अंशुमान’ या बंगल्यावर शनिवारी (ता. २०) छापा टाकला. यावेळी बंगल्यामध्ये कटारिया कुटूंबियांपैकी कोणीही उपस्थित नसल्याचे समजते. पोलिसांनी यावेळी गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रांचा शोध घेतला असता, त्यांच्या हाती काही कागदपत्रे सापडल्याचे समजते.

याप्रमाणे, सतिश पारख यांच्या गंगापूर रोड परिसरातील बंगल्यावरही पोलिसांनी छापा टाकून घरझडती घेतली. यातही पोलिसांच्या हाती गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे हाती लागल्याचे दावा पोलिसांनी केला आहे. मनोज लेखराम हरियानी यांच्या फिर्यादीनुसार, संशयितांनी त्यांची 99 लाखांची फसवणूक केलेली आहे.

“अशोक कटारिया, सतिश पारख यांच्या गंगापूर रोड परिसरातील घरी ‘सर्चिंग’ करण्यात आली. यात गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे पथकाच्या हाती लागली आहेत.”

  • मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त, परिमंडळ दोन

Leave a Comment

Vote Here

Loading poll ...
Coming Soon
Do You Like Our Website?
UPSE Coaching

Recent Posts