The Sapiens News

The Sapiens News

ACB Trap Srpf Group 6 Dhule : सहायक समादेशक चंद्रकांत पारसकर पाच हजाराची लाच स्वीकारतांन रंगेहात जाळ्यात

घरात स्वीकारली लाच

धुळे : गैरहजर आपत्ती प्रतिसाद कर्मचाऱ्यांची रजा विना पगारी करण्याची नोटीस देवून त्यांच्याकडून प्रत्येकी एक एक हजार असे एकूण पाच हजार  रु लाच घेतांना धुळे राज्य SRPF ६ चे सहायक समादेशक तथा राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत पारसकर याला ACB धुळे येथील पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारकर्ते हे SRFF गट कमांक ६ अंतर्गत महाराष्ट्र राज्य आपत्ती प्रतिसाद दलात नर्सिंग अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यासह इतर पाच महिला अधिकारी १४ आणि १५ एप्रिल रोजी गैरहजर होते. चांद्रकांत पारसकर यांनी या कर्मचाऱ्यांकडून गैरहजेरीबाबत उत्तर मागितला होता. ही रजा विनापगारी करण्याची पूर्वसूचना त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्याने ते पारसकर यांना त्यांच्या कार्यालयात भेटले. त्यानंतर पारसकर यांनी त्या सर्व कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी १००० रु प्रमाणे एकूण ५००० रु लाचे पोटी  द्यावेत, तसे सुचविले. तसे न केल्यास सर्वांची रजा बिनपगारी करण्याची धमकी दिली. या अनपेक्षित मागणीमुळे तक्रारदारांनी २० एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे कार्यालयात तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी केल्यावर पारसकर यांनी तक्रारदारांकडे गैरहजर कर्मचाऱ्यांकडुन प्रत्येकी १००० रुपयाप्रमाणे ५००० रु लाचेची मागणी केल्याचे उघड झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळ्याची तयारी केली.
पारसकर यांच्या नकाणे रोडवरील एस. आर.पी. कॉलनीत असलेल्या राहत्या घरीच ट्रॅप लावण्यात आला. स्वतःच्या घरात तक्रारदाराकडून पारसकर हे लाचेची रक्कम स्वीकारत असतांनाच त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे कारवाई होत असल्याचा संशय आला. यामुळे त्यांनी लाचेची रक्कम खाली टाकून दिली. परंतु, अधिकाऱ्यांनी त्याचवेळी त्यांना ताब्यात घेतले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागूल, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, प्रवीण मोरे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात पारसकरविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Comment

Vote Here

Loading poll ...
Coming Soon
Do You Like Our Website?
UPSE Coaching

Recent Posts