नाशिक जिल्ह्यात लोकसभा नुवडणुकीसाठी उमेदवरीपत्र दाखल करण्यासाठीच्या पहिल्याच दिवशी नाशिक मतदार संघासाठी १ व दिंडोरी मतदार संघासाठी २ असे एकूण ३ अर्ज दाखल झाले.
दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या दालनात माजी आमदार जे. पी. गावित व सुभाष रामु चौधरी यांनी (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, यांनी लोकसभेसाठी दिंडोरी मतदारसंघातून अर्ज दाखल केले.
तसेच नाशिक लोकसभा मतदार संघातून जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांच्या दालनात शांतिगिरीजी महाराज (नीपक्ष) यांनी अर्ज दाखल केला.