चार वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवणाऱ्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने काश्मीरमधील लोकसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतला आहे.
म्हणजे भाजप यावेळी काश्मीरमध्ये लोकसभा निवडणूक लढवत नाहीये. भाजपने हिंदूबहुल जम्मूमधील दोन जागांवर उमेदवार उभे केले असले तरी मुस्लिमबहुल काश्मीर खोऱ्यातील तीनपैकी एकाही जागेवर भाजपने उमेदवार उभे केलेले नाहीत.
राजकीय विश्लेषक आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे की भाजपच्या या निर्णयामुळे येथील लोकांमध्ये पसरलेल्या संतापाकडे लक्ष वेधले जाते, जे पक्ष देखील स्वीकारत आहे.
काश्मीर आणि दिल्ली यांच्यातील संबंध अनेक दशकांपासून तणावाचे आहेत. भारत सरकारच्या विरोधातील अतिरेकी आणि त्याला दडपण्यासाठी केलेल्या लष्करी कारवाईने गेल्या तीन दशकांत येथील हजारो लोकांचे प्राण घेतले आहेत.