गीता हेमंत बोकड (वय ४५ रा. गणेश वस्तू अपार्टमेंट अशोक नगर नाशिक) या विद्युत कार्यालयातील शिपाई महिलेस ५०० रुपयांची लाच स्वीकारतांन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. संबंधित महिलाने ठेकेदार व पर्यवेक्षक परवाना मिळविण्यासाठी ही लाच घेतल्याचे समजते. संबंधित महिले विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे- वालावलकर, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गायत्री जाधव, हवालदार संदीप वणवे, हवालदार ज्योती शार्दुल यांनी केली.
![](https://www.thesapiensnews.com/wp-content/uploads/2025/02/InCollage_20250205_201357818-1-scaled.jpg)