The Sapiens News

The Sapiens News

नाशिक शहर पोलीसांच्या नव्याने स्थापन झालेल्या ATC पथकाला काल रात्री एक महत्त्वपूर्ण यश मिळाले..

गेल्या आठवड्यात सुरू झालेल्या दहशतवादविरोधी मोहिमेदरम्यान नव्याने स्थापन झालेल्या एटीसीच्या नाशिकरोड पोलिस स्टेशनच्या (झोन 2) पथकाने बनावट ओळखपत्रांतर्गत नाशिकमधील एका लॉजमध्ये राहणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. टोळीच्या सदस्यांकडे अनेक बोगस कागदपत्रे आढळून आली, ज्याचा ते राज्यभरातील अनेक न्यायालयात गुन्ह्यातील आरोपींना जामीन देण्यासाठी वापरतात. आरोपी आणि प्रकरणांचा संबंध शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

एटीसी, नाशिक शहर पोलिसांबद्दल: डीजीपी कार्यालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आम्ही नाशिकच्या प्रत्येक पोलिस ठाण्यात ५ महिन्यांपूर्वी विशेष दहशतवाद विरोधी कक्ष तयार केला होता.

मोठे रॅकेट उघडकीस आणणाऱ्या ए.टी.सी.टीमच्या अतुलनीय कार्याचा विशेषत: हेड कॉन्स्टेबल संदीप पवार, पोलीस नाईक हेमंत मेडे आणि ⁠ पोलीस कॉन्स्टेबल राहुल मेहेंदळे यांचा मला अभिमान आहे, यासोबतच वरिष्ठ पोलीस निरीक्षक (नाशिक रोड पोलीस स्टेशन), सहायक पोलीस आयुक्त (नाशिक रोड विभाग) आणि पोलीस उपायुक्त (झोन-२) यांचे मी अभिनंदन करतो..

  • संदिप कर्णिक
    पोलीस आयुक्त, नाशिक शहर

Leave a Comment

Vote Here

Loading poll ...
Coming Soon
Do You Like Our Website?
UPSE Coaching

Recent Posts