मुंबई. देशातील एका मोठ्या उद्योग समूहाने 2023-24 या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल सादर केला. यामध्ये कंपनीच्या उच्च व्यवस्थापनाला दिलेल्या वेतन पॅकेजचा खुलासा करण्यात आला. आश्चर्याची बाब म्हणजे या कंपनीत सर्वाधिक 167 कोटी रुपये पगार कंपनीच्या मालकाला नाही तर दुसऱ्या अधिकाऱ्याला देण्यात आला. आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे कंपनीच्या कार्यकारी अध्यक्षांना सलग दुसऱ्या वर्षी वार्षिक बोनस (व्हेरिएबल) देखील मिळाला नाही. कारण या वर्षी कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा नकारात्मक होता.
ही कंपनी देशातील आघाडीची आयटी कंपनी विप्रो आहे. कंपनीने 167 कोटी रुपयांचे सर्वात मोठे पेमेंट आपल्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला केले. पण, ते विप्रोचे कार्यकारी अध्यक्ष ऋषद प्रेमजी नसून, विप्रोचे सीईओ असलेले थियरी डेलापोर्टे आहेत. मात्र, आता त्यांनी कंपनी सोडली आहे
स्टॉक एक्स्चेंजला दिलेली माहिती: कंपनीने यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनला दिलेल्या फाईलमध्ये म्हटले आहे की, एकत्रित निव्वळ नफ्यानुसार ऋषद प्रेमजी 0.35 टक्के कमिशनसाठी पात्र आहेत, परंतु ते नकारात्मक असल्याने, कोणतेही कमिशन देय नाही. ऋषद प्रेमजीच्या पगारातही सुमारे 20 टक्के कपात करण्यात आली, ज्यामुळे त्यांच्या FY24 पगाराच्या पॅकेजवर परिणाम झाला. 2023-24 या आर्थिक वर्षात त्यांना एकूण $7,69456 (सुमारे 6.5 कोटी रुपये) पगार मिळाला. 2022-23 या आर्थिक वर्षातील त्याच्या $9,51353 (अंदाजे 7.9 कोटी रुपये) कमाईपेक्षा हे कमी होते.