The Sapiens News

The Sapiens News

वास्तविक सत्ताधीश नक्की कोण ? राजकारणी, नोकरशहा, उद्योगपती ?

टीप : वाचकांना हा लेख वाचण्याआधी एक विनंती चांगले वाईट लोक प्रत्येक पेशात असतातच. त्यामुळे त्या त्या पेशातील टक्केवारी पहावी. येथे आम्ही नमूद करू इच्छितो की आम्ही प्रत्येक प्रामाणिक व्यक्तीचा आदर करतो आणि भ्रष्ट व्यक्तीचा धिक्कार. मग ती कोणत्याही पदावर असो.

एक pic सध्या खूप व्हायरल होत आहे त्यात विकासाच्या पाईप मधून येणारे पाणी कसे व किती कुणाच्या वाट्याला येते व कोण कसा त्यावर डल्ला मारतो याचे सुंदर विश्लेषण केले आहे. परंतु यात डल्ला मारणाऱ्याचा जो क्रम दाखविण्यात आला आहे तो थोडा चुकला असल्याचे माझे मत आहे. या चोरांच्या क्रमात सर्वात वरच्या म्हणजे सर्वात जास्त मलिदा खाणाऱ्यात मंत्री, ठेकेदार, नेता, प्रशासन हा क्रम आहे, म्हणजे पाणी असे मोठ्या ते छोट्या हीश्यात विभागले आहे, सरते शेवटी सामान्य माणूस असून त्याच्या वाट्याला काहीच येत नसल्याचे चित्र आहे. 
आत्ता आपण म्हणाल क्रम तर बरोबर आहे. त्यात काय चुकले आहे. तर या क्रमात मंत्री ते प्रशासन असा क्रम जो आहे त्यात नौकरशाह शीर्ष स्थानी असावे असे आमचे मत आहे.
नौकरशाह (प्रशासन) : ज्यात प्रशासकीय अधिकारी जसे IAS, IPS, सचिव, जिल्हाधिकारी, पोलीस, आयुक्त, मंत्र्यांचे स्वीय सह्ययक या सारखे अधिकारी येतात. ते सर्वात वरच्या फलित असायला हवे कारण नेत्यानाच्या तुलनेत ते अधिकारपद वा प्रशासनात सलग व किमान 30,35 वर्ष असतात. सरकार कुठले ही येवोत ते नेहमी तुपात असतात. विशेष म्हणजे यांना नेत्यांसारखी दर पाच वर्षांनी परीक्षा मग ती निवडणूक असो वा खात्यांतर्गत द्यावी लागत नाही. आयुष्यात फक्त 2,4 वर्ष मेहनत घेऊन ही मंडळी 25,30 च्या आत अधिकारी होतात ते 60 वर्षांपर्यंत त्यात राहतच नाही तर बढतीवर ही जातात. जशी नौकरी अधिक होते असे अधिकार व सुविधा ही अधिक वाढतात. वाईट हे की 80% कमी शिकलेले अथवा अशिक्षित असलेले भारतीय नेते हे सत्तेत असो की विरोधी पक्षात त्यांना यांची गरज पडतेच. असे नाही की यांचे कधीच वाईट दिवस नसतात. असतात पण यांना त्या काळात कसे मॅनेज करायचे याचे कौशल्य छान अवगत असते. अनेकवेळा त्यांचा हस्तक्षेप एवढा असतो की हे विशिष्ट नेत्यास फंडिंग करून निवडून आणण्याची ताकद ही ठेवतात. कोणती योजना कशी, किती, केव्हा काढायची आणि त्यात कसा मलिदा काढायचा याच असखलीत ज्ञान यांना असते त्या बाबतीत ते राजकारण्यांचे ही गुरू असतात. त्यांची युनियन एवढी मजबूत असते की अनेकदा राजकाऱ्यांना ही नमते अथवा जुळवून घ्यावे लागत. यांच्यावर अन्याय एकतर होत नाही झाला तरी CAT, MAT असतेच आणि 2,4 वर्षात सत्ता पालटली की हे पुन्हा तुपात येतात. हे फक्त दोनच कामे करतात पोस्टिंगसाठी टेंडर भरणे व भरलेल्या टेंडरची 4,5 पट वसुली करणे. आज असे अनेक bureaucrat आहेत की ज्यांची नामी व बेनामी संपत्ती ही अनेक नेत्यांपेक्षा ही अधिक आहे. महत्वाचे हे की नेत्यांवर झालेले आरोप त्यांच्या चौकशा व बऱ्याच गोष्टींचे अहवाल व तपास हेच करतात अथवा यांनाच तो अधिकार असतो अर्थात बहुतांश वेळेला. अगदी निवृत्त झाल्यावरही यांना 2 अतिशय उत्कृष्ट पर्याय असतात. एक राजकारणात जाणे वा मोठं मोठ्या उद्योग समूहात CEO म्हणून रुजू होणे आणि या दोन्ही पर्यायात प्रचंड ताकद आहे हे आपण जाणताच.
महत्वाचे हे की एक गुंड राजकारणी तर होऊ शकतो पण bureaucrat नाही. अगदी राजकारणी ही bureaucrat होऊ शकत नाही. यांच्या वरती जर कुणी असेल तर ते म्हणजे उद्योगपती. ज्याची मीमानसा देखील या pic मध्ये नाही. हे नौकरशाहा एवढे शक्तिशाली असतात की, जनता, नेते, सत्ताधारी, विपक्ष, अपक्ष, मोठं मोठे उद्योगपती यांना जोडणारा सर्वात प्रभावशाली व्यक्ती म्हणजे bureaucrat असतो. त्यांची मुले ही काही कमी नसतात ते अतिशय आलिशान जीवन जगतात ते एकतर मोठे businessman असतात अथवा politician, bureaucrat, well established foreigner वा NRI तर नक्की असतात. म्हणून यांच्या पुढे कुणीच काहीही नसते. शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा तर एवढ्या असतात की नेत्यांनाही लाजवेल किमान 15 ते 20 लोकांचा पर्सनल स्टाफ यांना 24 तास × 365 दिवस × 60 वर्षांपर्यंत असतोच असतो.
असे हे नौकरशाहा भारतीय सविधानाच
च्या चार स्तंभांपैकी एक स्तंभ. आता खरंतर हेच देशाशी वाट ही लावू शकतात नी भरकटलेल्या देशाला वाटेवर ही आणू शकतात. असे नाही की त्यात प्रामाणिक लोक नसतात नक्कीच असतात पण येथे ही पण येतोच……
हे किती शक्तीशाली आहेत याची तुलना यांचे वेतन, अधिकार, सुविधा या नेत्यांच्या सुविधेशी करा म्हणजे लक्षात येईल. फरक स्पष्ट जाणवेल. मंत्री, पालकमंत्री बदलले जातील पण कुठेही गेले तरी नौकरशाहा हे त्याच नाही त्यापेक्षा अधिक सुविधांनीशी बढती वरच जातील.
म्हणून आजच्या तरुणांना एकच विनंती नेत्यांच्या मागे लागून स्वतःवर केसेस करून घेण्यापेक्षा 4,5 वर्ष कसून मेहनत करा नेत्यांची ही चौकशी करण्याचे अधिकार तुम्हाला असतील. मग तो सत्तेतील असो की विरोधीपक्षातील. तसे तर या सत्तेच्या फळीत सर्वात शीर्ष स्थानी कुणी असेल तर ते आहे उद्योगपती पण त्यासाठी 2,3 पिढ्या एकाच व्यवसायत घासाव्या लागतात.

संपादक : शिरीष प्रभाकर चव्हाण
दि सेपिअन्स न्युज

Leave a Comment

Vote Here

Loading poll ...
Coming Soon
Do You Like Our Website?
UPSE Coaching

Recent Posts