वयाच्या ४९ व्या वर्षी केली उल्लेखनीय कामगिरी
22 मे हा महाराष्ट्र पोलीसमध्ये असलेल्या पोलीस निरीक्षक द्वारका विश्वनाथ डोके यांच्यासाठी व महाराष्ट्र पोलीस करिता देखील अतिशय अभिमानाचा दिवस ठरला. त्याच कारणही तसंच आहे द्वारका यांनी याच दिवशी जगातील सर्वात उंच शिखर आपल्या दिवंगत आईवडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर केले. एक महिला म्हणूनच नाही तर एक मुलगी एक पोलीस अधिकारी म्हणूनही त्यांची ही कामगिरी अतिशय कौतुकास्पद आहे.
त्यांनी 17 मे रोजी हे शिखर सरकरण्यास सुरवात केली आणि 22 मे रोजी त्या एव्हरेस्टच्या शिकरवर होत्या त्यातही त्यांनी भारताचा व महाराष्ट्र पोलीसचा झेंडा फडकवत आईवडिलांना श्रद्धांजली वाहिली तसेच राष्ट्रगान म्हंटले.
पोलीस विभागात व समाजाच्या विविध स्तरावर त्यांचं मोठं कौतुक होत असून त्यांच्या मूळ गावी केसापूर अहमदनगर येथे ही याचे सत्कार समारंभ आयोजित केले जात आहे. एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या कंपनीचे मालक लकपा शेरपा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ही मोहीमे सर केली.
दि.सेपिअन्स न्युज