नाशिक : सिंधू सागर अकादमी इंग्लिश मीडियम हायस्कूलने त्यांच्या पूर्व-प्राथमिक विभागात अनेक आकर्षक उपक्रमांसह फादर्स डे मोठ्या उत्साहात साजरा केला. तरुण विद्यार्थ्यांनी त्यांच्या वडिलांसाठी ‘लव्ह हग’ कार्ड बनवले, त्या द्वारे त्यांनी त्यांच्यातील आपल्या वडीलांन प्रती जिव्हाळा दर्शविला. त्याचबरोबर या उपक्रमाने त्यांच्यातील सर्जनशीलता ही दिसली. कार्ड बनवण्याबरोबरच, मुलांना फिंगर चिप्स बनवण्याचा आणि इतर मजेदार उपक्रमात सहभागी होण्याचा आनंद ही लुटला आला. शाळेच्या मुख्याध्यापीकांनी विद्यार्थ्यांचे त्यांच्या उपक्रमासाठी कौतुक व मार्गदर्शन केले आणि त्यांच्यातील सकारातत्मक दृष्टिकोन वाढविण्यासाठी प्रोत्साहन ही दिले. शिक्षकांनी सांगितले की, या उत्सवाचा उद्देश पालक व पाल्यातील बंध अधिक दृढ करणे हा आहे. ज्यामुळे मुले आणि त्यांचे वडील यांच्यात कौतुक, प्रेम व स्नेहबंध अधिक वृद्धीगत होतील.
सिंधू सागर अकादमी इंग्लिश मीडियम हायस्कूल येथे मुलांच्यात सकारत्मक व सृजनशिक दृष्टिकोन वाढीसाठी तसेच त्यांच्यात सामजिक आस्था कर्तव्य व समाजबंधाचे महत्व विकसित करण्यासाठी विविध सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. जेणे करून सिंधू सागर अकादमी इंग्लिश मीडियम हायस्कूलचे विद्यार्थी समाजात विधायक भर घालू शकेल आणि हे ते त्यांचे कर्तव्य मानतात. 1949 साली स्थापन झालेल्या या संस्थेने नाशिकच्या शिक्षण क्षेत्रात मोलाची भर घातली आहे.