मी अनेकदा शिक्षण व्यवस्थेवर सडकून टीका करतो आणि त्याच कारण ही तसच आहे. तुम्ही पहाना. शिक्षणाचे किती अवमूल्यन झाले आहे. जुगारात पैसे गमावण्याचा जेवढा धोका वा गॅरंटी नसते तेवढी गॅरंटी व धोका आज शिक्षण क्षेत्राचा झाला आहे. पहिली पासून ते post graduation पर्यतचे शिक्षण घेण्यासाठी मुले व पालक किती जीवाची ओढाताण करतात. किती आशा आकांक्षा शारीरिक मानसिक कष्ट उचलतात पहिला नंबर येण्यासाठी किती काय काय करतात अनेक कर्जे काढून मुलांना शिकवितात का तर शिक्षणाने आपल्या मुलाला एक समृद्ध जीवन लाभेल ते आत्मसन्मान जगेल त्याला दोन घास स्वाभिमानाचे मिळतील. एवढी माफक अपेक्षा असते भाबड्या पालकांची. पण जेव्हा मुलांचे शिक्षण पूर्ण होते व सामाजिक विदारक स्थिती समोर येते. तेव्हा पाल्याला व पालकांना आपली फसवणूक झाल्याचे जाणवते. जेव्हा मोठं मोठ्या डिग्रीज घेऊन जसे डॉ. इंजिनिअर ही मुले पोलीस शिपायाच्या पदासाठी अर्ज करतात तेही काही एकशे जागासाठी लाखो अर्ज येतात तेव्हा शिक्षण व्यवस्थेचे धिंडवडे निघतात. पद वा काम कुठलं छोटं वा मोठ नसतं हे जरी थोडावेळ गृहीत धरले तरी प्रत्येक पदाच्या अहर्ता ठरविण्या मागे काही लॉजिक असते हे ही जाणून घेतले पाहिजे. जेव्हा पदांचा व अहर्ता असलेल्या शिक्षणाचा समतोल रहात नाही तेव्हा समजावे त्या क्षेत्रात आहाकार माजला आहे. लाखोंच्या संख्येने अर्ज करणारी मुले लाखोंच्याच संख्येने निवडले जात नाही ना तेव्हा सामजिक स्तरावर आत्महऱ्या गुन्हेगारी लाचारी अवहेलना आणि त्यातून येणारा सामाजिक व्यवस्थेला धोका किती मोठा आहे हे लक्षात येते. आणि याचे मूळ आहे आपली शिक्षण पद्धती जी दोनवेळचे दोन घास ही मिळवून द्यायला कुचकामी झाली आहे.
शिरीष प्रभाकर चव्हाण
संपादक : सेपियन्स न्युज