अग्निवीर अजय सिंह : सध्या देशभरात २३ वर्षीय अग्निवीर अजय सिंह यांच्या हौतात्म्याची चर्चा होत आहे. खरे तर, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत आणि सोशल मीडिया पोस्टमध्ये अग्निवीर अजय सिंह यांच्या कुटुंबीयांना लष्कराकडून नुकसानभरपाई देण्यात आली नसल्याचा दावा केल्यापासून, यावरून वाद सुरू आहे.
आता भारतीय लष्कराने अजय सिंगच्या कुटुंबीयांना ९८ लाख ३९ हजार रुपयांची मदत दिल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तपास प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या कुटुंबाला 67 लाख रुपयांची अतिरिक्त रक्कम दिली जाईल, असे लष्कराने म्हटले आहे. एका टीव्ही मुलाखतीत अजय सिंगचे वडील चरणजीत सिंह यांनी दावा केला आहे की, जवळपास 1 कोटी रुपये आले आहेत.
कोण होते अग्निवीर अजय सिंह? अग्निवीर अजय सिंह यांचा जानेवारी २०२४ मध्ये जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये भूसुरुंगाच्या स्फोटात मृत्यू झाला. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ झालेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात अग्निवीर अजय सिंह यांचा दुःखद मृत्यू झाला.