नाशिक : सिंधू सागर अकादमी इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये पालक शिक्षक संघाची (PTA) महत्त्वपूर्ण बैठक झाली. लॉटरी पद्धतीने नवीन कार्यकारिणी सदस्यांची निवड हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट होते. नवनियुक्त सदस्यांचा शाळेच्या मुख्याध्यापकांच्याH हस्ते सत्कार करण्यात आला.
मेळाव्यात पालकांना आगामी शैक्षणिक वर्षाच्या सर्वसमावेशक नियोजनाची माहिती देण्यात आली. यात सह-अभ्यासक्रम उपक्रम, अभ्यासक्रम नियोजन व योजना आणि एकूणच शैक्षणिक विकास यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या विषयीचे सखोल सविस्तर मार्गदर्शन श्रीमती सिमरन मखिजानी प्राचार्य सिंधू सागर अकादमी इंग्लिश मीडियम हायस्कूल यांनी पालकांना केले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्याचे महत्त्व ही त्यांनी विशद केले. पालकांच्या सक्रिय सहभागाची आणि समर्थनाची कबुली देऊन प्रचार्यांचे व सर्व शिक्षकांचे आभार मानून बैठकीची सांगता झाली.