मुंबई : जादूटोणा नरबळी अंधविश्वास अंधश्रद्धा यांचे समोर उच्चाटन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक पाऊल अधिक पुढे उचलले असून महाराष्ट्र पोलीस च्या माध्यमातून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्याचा निर्णय पोलीस महासंचालक कार्यालयातून घेण्यात आलेला आहे
याद्वारे अंधश्रद्धा जादूटोणा यांच्या विरोधात प्रचार करण्यासंदर्भात आदेश देण्यात आलेले असून यासंदर्भातील गुन्ह्यांमध्ये अधिक वाट नको व्हायला तसेच त्यांना प्रतिबंध बसावा यासाठी हा विभाग किंवा हे कक्ष भविष्यात कार्य करेल ज्यामुळे भविष्यात घडणाऱ्या नरबळी अंधविश्वास किंवा जादूटोणा या संदर्भातल्या प्रत्येक घटनांना प्रतिबंध करण्यासाठी हा कक्ष प्रयत्न करत असेल.
नरबळी आणि इतर जादुटोणा अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा या संबंधित गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ च्या कलम ५ (१) अन्वये संबंधित आदेश जारी करण्यात आले आहे. राज्यातील सर्व पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात सहाय्यक आयुक्त (गुन्हे), तसेच पोलीस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रात पोलीस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा) यांची दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती करावी, तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत अधिनियम २०१३ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक कक्ष स्थापन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.