The Sapiens News

The Sapiens News

गंगापूर धरणसाठा : पावसामुळे धरण किती भरलं

नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू आहे.  त्यामुळे जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा वाढला असून, दारणा धरणातून पुन्हा एकदा पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.

शहर परिसरात आज सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे.  इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर येथे होत असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात (नाशिक डॅम पोझिशन) वाढ झाल्याचे चित्र आहे.  इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून दारणा धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. 

नाशिककरांची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणाचा पाणीसाठा 70 टक्क्यांवर पोहोचला आहे.  इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने दारणा धरणातून पुन्हा पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.  सकाळी 9 वाजल्यापासून दारणा धरणातून दारणा नदीत 9 हजार 334 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. 

नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे 

पाण्याचा विसर्ग सुरूच असल्याने प्रशासनाने दारणा नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.  दारणा धरणातून पाणी सोडल्याने जायकवाडीची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे.  गेल्या आठ दिवसांपासून दारणा धरणातून पाणी सोडले जात आहे.  नाशिकमध्ये आजपासून संततधार पाऊस सुरू असल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे.  

Leave a Comment

Vote Here

Loading poll ...
Coming Soon
Do You Like Our Website?
UPSE Coaching

Recent Posts