सोने खरीदी संदर्भात THE SAPIENS NEWS च्या संपादकांनी घेतलेला अनुभव त्यांच्याच शब्दात.
” आपल्या देशात सोने खरेदी विषयी खरंच खूप गोंधळ आहे. विशेषतः भावात,परतीच्या नीती विषयी आज चार पिढ्यात गेलो अर्थात दुकानात 1 कल्याण ज्वेलर्स 2 तनिष्क 3 रिलायन्स 4 मलबार चारही ही ठिकाणी भावात फरक कुणी मुंबईचा कुणी केरलाचा कुणी नाशिकचा भाव लावते. भारताचा भाव कुणाकडेच नाही. दुसरं म्हणजे जर काही वर्षात घेतलेलं सोन विकण्याची पाळी आलीच तर कॅश मिळण्यातही टक्यांची काटछाट. त्यात कल्याण ज्वेलर्स परतीला त्यावेळच्या बाजार भावाच्या 2%, तनिष्क 3% रिलायन्स 3% मलबार 1% कमी पैशे देणार यात मेख ही की ही टक्केवारी ही कुणी लिहून द्यायला तयार नाही उत्तर एकच आज आहे उद्या यात कमी जास्त ही होऊ शकते, याला अपवाद फक्त एकच आणि तो म्हणजे कल्याण ज्वेलर्स त्यांनी त्याच्या बिलावरच स्पष्ट लिहून दिले आहे भविष्यात परतीसाठी 2% च लेस होतील जे मला भावलं म्हणून मलबार 1% लेस करीत असतांनाही की कल्याण ज्वेलर्सला प्राधान्य दिले. कारण त्यांच्यात तनिष्क, रिलायन्स व मलबार यांच्या पेक्षा अधिक स्पष्टता जाणवली आणि शास्वती ही. कुणीही ग्राहकांना लिखित शास्वती ही दिली नाही ना तोंडी आश्वासन जे मला कल्याण ज्वेलर्स कडून मिळाले. कारण माझ्यासारख्या ग्राहकाला कोणत्याही गोष्टी पेक्षा विश्वासार्हता अधिक आवश्यक वाटते. जे माझ्यासासाठी अधिक महत्त्वाचे आहे. जर policy त clarity च नसेल तर आपण अशा ब्रँडशी व्यवहार तरी का करावा ?”