नाशिक : तक्रारदाराच्या २०१६ ते २०२३ सालापर्यंतच्या वेतनाच्या फरकाचे देयक मंजूर करून ती रक्कम मिळण्याच्या बदल्यात तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी शाळेतील शिपाया मार्फत ३१ जुलै रोजी करणाऱ्या मुख्याध्यापक संशयित सुनील वसंत पाटील वय वर्ष ५४ व शिपाई बाळू हिरामण निकम वय वर्ष ५५ या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ जाळ्यात अडकवले. दोघेही सिन्नर तालुक्यातील रामनगर भागातील प्राथमिक आश्रमशाळेत कार्यरत आहेत. लाचखोर पाटील याने संबंधित लाचेची रक्कम ही शिपाई निकम यांच्याकडे देण्यास सांगितले हा सर्व प्रकार पंचांन समक्ष झाला.
तक्रारदाराने ACB कडे तक्रार केली असता. पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या आदेशान्वये पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, प्रफुल्ल माळी, संतोष गांगुर्डे, विलास निकम आदींनी मंगळवारी (दि. १३) आश्रमशाळेच्या आवारात सापळा रचला. संबंधितांना लाच घेतांना रंगेहात अटक केली.