आगामी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे होणार आहे. त्यामुळे या संमेलनात मराठी भाषेला अभिजात दर्जा प्रदान केला जाणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तब्बल 70 वर्षांनी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा मराठी भाषेचा डंका वाजणार आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यंदा 98 वे वर्ष असून ते राजधानी दिल्ली येथे पार पडणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. या संदर्भातील घोषणा पुण्यातील साहित्य परिषदेच्या पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे.
निवडण करण्याची घोषणा करण्यात आली. ही घोषणा अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्राध्यापक उषा तांबे यांनी केली आहे
डॉ. तारा भवाळकर या वैचारिक लेखिका असून त्यांचा जन्म 1 एप्रिल 1939 साली झाला आहे. डॉ. भवाळकर यांनी अनेक वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले आहे. निवृत्तीनंतर त्यांनी पुणे येथील ललित कला अकॅडेमी आणि मुंबई विद्यापीठ लोककला अकॅडेमी येथे अतिथि प्राध्यापक म्हणून देखील काम केले आहे. लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककला या विषयांमध्ये त्यांचा सखोल अभ्यास होता. याचसोबत नाट्यसंशोधन, संतसाहित्य, एकांकिका, ललित लेखन आणि स्त्री जाणिवांवर भाष्य करणारे लेखन त्यांनी प्रामुख्याने केले आहे. तारा भवाळकर यांचा मराठी विश्वकोश, मराठी वाङमयकोश आणि मराठी ग्रंथकोश या महत्त्वाच्या कार्यातही त्यांचे योगदान आहे.
डॉ. तारा भवाळकर यांनी लोकसाहित्यापासून नाट्यशस्त्रापर्यंतचा संशोधक संदर्भ कोष, मार्क्सवाद ते गांधीवाद यांचा सूक्ष्म अभ्यास, भारतीय संस्कृतीपासून आधुनिक स्त्रीवादी चळवळीच्या साक्षेप समीक्षकण, साहित्यापासून सामाजिक चळवळ अशा सर्वच विषयांत त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.