BJP ने ज्या वेळेला एकनाथ शिंदे त्यांच्याकडे असतांनाही व सरकार भक्कम स्थितीत असतांनाही अजित पवार यांना युतीत सामील करून घेतलं त्यावेळी अनेकांना असे वाटले की कशासाठी हे सामील करून घेतले ? काय गरज आहे अजित पवारांना एवढे महत्व देण्याची ?
तर त्याचं आज कारण आपल्याला लक्षात येईल भविष्यात ऐकनाथ शिंदे यांनी काही अवाजवी डिमांड केली वा नाटक केले तर अजित पवारांना समोर ठेवून वा अप्रत्यक्ष त्यांचा धाक दाखवून नियंत्रणात ठेवायचे. याला शुद्ध blackmailing ही म्हणू शकता आता कुणी म्हणेल BJP ने शिंदेंना मुख्यमंत्री ही केले. त्याचं एक विशिष्ट कारण आहे बहुसंख्येने महराष्ट्रात असलेल्या मराठ्यांना आजही BJP दुखवू शकत नाही. एकनाथ शिंदे त्यांच्या सारखा एक मराठा फेस पुढे ठेवून त्यांनी मराठा समाज, आरक्षण आंदोलक, जरांगे पाटील, शरद पवार, काँग्रेस अगदी देवेंद्र फडणवीस (उंची तेवढीच वाढवायची की दिल्ली दरबारात वारीस नको) यांना देखील एकाच वेळी गुगली दिली. अर्थात अजेंडा पडद्याआड BJP, RSS यांचाच राबवला गेला. स्टेपनी नक्कीच नेहमी कामी येत नाही पण जेव्हा कुणीच कामी येत नाही तेव्हा स्टेपणीचे महत्व कळते. ज्याला शुद्ध भाषेत BACKUP म्हणतात आणि BJP साठी सर्वात महत्त्वाचा व्यक्ती आहे अजित पवार, आजतरी. अर्थात त्यांना देखील पर्याय असेलच शेवटी आधुनिक चाणक्य शहा आहेत पण भोळीभाबडी जनता उगाच फडणवीसांना चाणक्य मानते. तुमचा उपयोग गडकरींसाठी केला गेला आहे जाणार. एकमात्र नक्की मोदी नी शहा यांना गडकरी कधीही उजवे…..
हा एक विचार आहे आमच्या दृष्टीने त्याला काय मानायचे हे वाचकांनी ठरवावे.
शिरीष प्रभाकर चव्हाण : संपादक : दि.सेपिअन्स न्युज