BJP ने भारतीय राजकारणाच समीकरणच बदलून टाकलं आहे. पूर्वी मुस्लीम, मराठा, दलित, वंजारी, माळी, आदिवासी, धनगर नेत्यांना कुणी दुखविण्याचे धाडस करीत नसे. कारण त्याचा डायरेक्ट परिणाम हा मतदानावर होई. त्याला फाटा देत BJP ने एक नवीन व काँगेस व मित्रपक्षाने ज्याला कधी ही महत्व दिले नाही अगदी 70 वर्ष उपेक्षित ठेवलं त्या गटाला जागे केले. त्याला अस्मितेची रक्षणाची धार दिली आणि ती देतांना श्री राम मंदिर, प्रोहिंदू पॉलिसी, कलम 370, वक्त कायदा अशा अनेक मुद्द्यांचा आधार घेतला. बटेंगे तो कटंगे, एक है तो सेफ हे याचा जोरात प्रचार केला. याचमुळे कदाचित जातीत विभागलेला हिंदू समाज धर्म म्हणून पुढे आला. BJP ने जातीपेक्षा धर्म अधिक मोठा असतो हे हिंदूंच्या मनात कोरले. आज जो मतदानाचा आकडा वाढला आहेना तो घराबाहेर हिंदू आलेल्यांचा आहे. कुणा एका जातीचा नाही. आणि हे BJP ला चांगले माहीत आहे. म्हणून ते कोणत्याही जातीचा गटाचा मोठा नेता असो त्याला डावळते, तुरुंगात डांबते, त्याला दुर्लक्षित करू शकते. आणि ही त्यांची पॉलिसी तोवरच चालेल जोवर हिंदू परत जातीत विभागला जात नाही म्हणूनच कांग्रेस जातीनिहाय जनगणना मागते आहे आणि BJP चा त्याला प्रखर विरोध आहे. कारण या दोन्ही पक्षाचे राजकारण हिंदूंवरच चालते फरक फक्त एवढाच की हिंदू फुटला की कांग्रेस सत्तेत येते आणि हिंदू एकवटला की BJP.
संपादक : शिरीष प्रभाकर चव्हाण : दि. सेपिअन्स न्युज
Vote Here
[TS_Poll id="1"]
Recent Posts

मित्र शक्ती २०२५: कर्नाटकातील बेळगावी येथे भारत आणि श्रीलंकेचा संयुक्त लष्करी सराव सुरू
The Sapiens News
November 10, 2025

‘टॅरिफच्या विरोधात असलेले लोक मूर्ख आहेत’: ट्रम्प
The Sapiens News
November 9, 2025

दिल्लीतील हवेची गुणवत्ता ‘गंभीर’ श्रेणीत
The Sapiens News
November 9, 2025

भारत राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिन साजरा करणार
The Sapiens News
November 8, 2025
