कोपरगाव तालुक्यात एक अतिशय धक्कादायक लबाडी समोर आली असून त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा संताप होत आहे. सदर लबाडी ही युरिया अथवा शेती संदर्भातील औषधांन संबंधित असून स्थानिक शेतकऱ्यांना फवारणी औषधे वा युरिया घेतांना दुकानदार हे इतरही अनावश्यक औषधे घेण्याचे बंधन घालीत आहे अनावश्यक औषधे न घेतल्यास अत्यावश्यक खते, युरिया वा इतरही औषधे देण्यास टाळाटाळ करीत असल्या बाबतचा तक्रार अर्ज कोपरगावचे शेतकरी नेते प्रवीण शिंदे यांच्या नेतृत्वात संघटित शेतकरी गटाने कोपरगावचे तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, यांच्याकडे केला आहे. शेतकऱ्यांचा रोष वाढल्याने सदर अधिकारी यांनी तात्काळ कृषी निविष्ठा विक्रेते यांना सदर प्रकार थांबविण्याचे व पत्र तसे न करण्याच्या सूचना केल्या आहे. त्यांच्या भाषेत या प्रकाराला लिंकिंग संबोधले जाते.
हा प्रकार शासकीय वरील अलिखित आदेशान्वये, अधिकारी पातळीवर वा दुकानदारांच्या मनमानीने चालतो की यात आणखी कुणाचे हात ओले होता हे समजणे अवघड जरी असले तरी हा निव्वळ भ्रष्टाचार, लूटमार, लबाडी असल्याचे शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे. हा प्रकार फक्त कोपरगाव तालुक्यातच होत आहे की आणखी ही याची व्याप्ती मोठी आहे याचा शोध घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे.