सलग दुसऱ्या दिवशी मनपा आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी रामकुंड, पंचवटी परिसराची पहाणी केली.
येणारा सिंहस्थ कुंभमेळाआणि रामकाल पथ, नमामी गोदा प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक २८ डिसेंबर रोजी पहाटे पंचवटी भागात पहाणी दौरा केला.
या पहाणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ.आवेश पलोड,कार्यकारी अभियंता संदेश शिंदे आदींसह अधिकारी सहभागी होते.
सकाळी मनपा आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांचा गोदावरी नदी परिसर पाहणी दौरा संपन्न झाला.
या पाहणी दरम्यान शाश्वत पर्यटनाच्या अनुषंगाने पर्यटकांना सुविधा देण्याच्या दृष्टीने गोदावरी नदीकाठ परिसर, अहिल्याबाई होळकर पुला खालील पाय-या , वस्त्रांतरगृह , रामकुंड परिसर, अहिल्याबाई होळकर पुलापासून ते गाडगे महाराज पुलापावेतोचा नदी काठ व नदीचा परिसर , पंचवृक्ष परिसर, सितागुंफा परिसर, काळाराम मंदिर व त्यालगतचा शाही मार्ग परिसर त्याचप्रमाणे श्रीराम उद्यानापासून ते रामकुंडा पावेतोचा रस्ता इ. विविध ठिकाणांची पाहणी केली. पाहणी दरम्यान आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी या परिसराचा विकास करण्याच्या दृष्टीने सुचना दिल्या. तसेच नाशिक शहरातील या परिसराचा जागतिकस्तरावर “आयकॉनिक पर्यटन स्थळ” म्हणून विकास व्हावा यासाठी केंद्र शासनामार्फत मंजुर प्रकल्पात करण्यात येणारी कामे त्याव्दारे स्थानिक अर्थ व्यवस्थेची वाढ व शास्वत पर्यटन हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश साध्य होणार असल्याने शाश्वत पर्यटनाचे पालन करून त्याचा एकूण अनुभव पर्यटकांना देण्यासाठी प्रयत्न करणे कामी “रामकाल-पथ ” प्रकल्प पुर्ण कार्यक्षमतेने कार्यान्वीत करणेकामी विविध सुचना दिल्या. “रामकाल-पथ ” प्रकल्पांतर्गत विविध सुविधायुक्त कामे लेझर शो, पाण्याचे कारंजे-फवारे, बोटींग, तात्पुरते वस्त्रांतरगृह , पिण्याच्या पाण्याची सुविधा, पार्किग सुविधा, नो व्हेईकल झोन,नो प्लास्टीक झोन त्याच प्रमाणे रामकुंड येथे स्नानासाठी योग्य पाण्याचा पुरवठा होण्याच्या दृष्टीने कामे तसेच रामायणातील विविध प्रसंग, म्युरल्स, पुतळे, भिंतीचित्रे, कमानी , दिपस्तंभ व आकर्षक वि्द्युत रोषणाई याव्दारे संपुर्ण परिसराचे सुशोभिकरण करणे कामी हाती घेण्यात आलेला प्रकल्प पुर्ण करणेबाबत सुचना दिल्या.