सन्माननीय दमानिया मॅम,
दोन दिवसांपूर्वी आपण पत्रकार परिषदेत सांगितले की गोपीनाथ मुंडेंपासून ते धनंजय मुंडेपर्यंत बीड व परळीत पोस्टिग होणारे बहुतांश शासकीय अधिकारी हे वंजारी समाजाचे आहेत. आपल्याला असे सांगायचे होते का की येथे पोस्टिंगसाठी प्राधान्य केवळ जात पाहून दिला जाते. आपला म्हणणं सत्य जरी असलं तरी ते अर्धसत्य आहे असे आमचे मत आहे. पूर्णसत्य हे की मागील काही काळात ज्याही हत्या या परिसरात झाल्या त्यात बहुतांश हे वंजारी बांधवच होते. वाईट हे की मारणारे आरोपी ही वंजारीच आहेत दुर्दैव हे की त्यातील बहुतेकांचा आत्मा हा आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे नी आरोपी मोकाट. त्याच बरोबर आपल्या म्हणण्यानुसार अधिकारी एकाच जातीचे असले तरी तेथे विकास मात्र 0 आहे. परळीचा पॅरिस सोडा बारामती ही नाही झाला आजही येथील तरुण नौकरी व शिक्षणासाठी पुणे व छत्रपती संभाजीनगरला जातात. विकास झालाच असेल तर तो त्या अधिकाऱ्यांना आनणाऱ्याचा झाला आहे. म्हणून आपल्याला एकच विनंती वंजारी समाजाला या दलदलीत न ओढता. आपण संतोष देशमुखांना व त्याच बरोबर 109 वर हत्या झालेल्या हुतात्म्यांना न्याय देण्यासाठी लढावे ज्यात बहुतांश वंजारी बांधव ही आहेत. जातीवर जर व्यक्ती चांगला व वाईट ठरत असता तर रावण वाईट नसता व रोहिदासजी संत. उगाच जातमध्ये आणून दोन जातीत समाजात क्लेश निर्माण करू पाहणाऱ्यांना आयती संधी नका देवू…
दि. सेपियन्स न्युज आपल्याला नेहमी वंदन करील.
शिरीष प्रभाकर चव्हाण
संपादक : दि. सेपियन्स न्युज
![](https://www.thesapiensnews.com/wp-content/uploads/2025/02/InCollage_20250205_201357818-1-scaled.jpg)