-कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय गंगापूर रोड नाशिक येथील विद्यार्थ्यांना एलिमेंटरी व इंटरमिजीएट या शासकीय चित्रकला परीक्षेत घवघवीत यश प्राप्त झाले असुन या दोनही परीक्षांचा निकाल १०० टक्के लागला आहे.विद्यालयाचे कलाशिक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांनी हे यश प्राप्त केलेले आहे.एलिमेंटरी परीक्षेत एकुन चौदा विद्यार्थी प्रविष्ट होते तर इंटरमिजीएट परीक्षेत एकुन चोवीस विद्यार्थी प्रविष्ट होते.विद्यर्थांच्या या यशाबद्दल शाळा विकास समितीच्या अध्यक्षा डॉ.योगिता हिरे यांनी कौतुक करुन शुभेच्छा दिल्यात तर विद्यालयाचे मुख्याध्यापक महेश पाटील, पर्यवेक्षक धनंजय देवरे, संस्था प्रतिनिधी सुजाता पवार यांच्या शुभहस्ते या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.प्रसंगी मुख्याध्यापक महेश पाटील म्हणाले की या शासकीय चित्रकला स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलेला वाव मिळतोच शिवाय दहावीच्या परिक्षेत या विद्यार्थ्यांच्या गुणांकणात वाढ होते.कलाशिक्षक संजय जगताप यांनी सुत्रसंचलन व आभार व्यक्त केले.
नाशिकच्या के.बी.एच.विद्यालयाचा शासकीय चित्रकला परीक्षेचा १०० टक्के निकाल
Vote Here
Recent Posts
हिंडेनबर्ग संशोधन बंद, संस्थापकांनी ऑपरेशन्स बंद केले
The Sapiens News
January 16, 2025
भारत हा यशस्वी अंतराळ डॉकिंग करणारा चौथा देश ठरला
The Sapiens News
January 16, 2025
हिंदी महासागर क्षेत्रात मजबूत नौदल ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे: राजनाथ सिंह
The Sapiens News
January 15, 2025
आयएमडीच्या १५० व्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी ‘मिशन मौसम’ लाँच केला
The Sapiens News
January 15, 2025