अगदी कोणताही आत्महत्येत पहिला मुद्दा असतो आत्महत्या कशी केली अर्थात पद्धत आणि दुसरा मुद्दा असतो का केली ? जो अति महत्वाचा असतो. पोलिसांच्या आत्महत्येत केवळ पहिला मुद्दा पाहिला जातो. दुसरा जो मुद्दा आहे त्यावर कुणी लक्षच देत नाही आणि तिथेच शासन, समाज आणि ज्यांची प्राधान्याने जबाबदारी आहे असा पोलीस विभाग लक्षच देत नाही का माहीत आहे भरतीच्या तुलनेत अजून तरी आत्महत्या कमी आहे असा यांत्रिक विचार कदाचित हे लोक करीत असतील. कारण त्यांचे मन नी मस्तिष्क मशीन झाले आहे. विभागात एक म्हण आहे जी खूप दांभिकपणे प्रचलित आहे. आणि ती म्हण आहे. “कुणीही गेले तरी खाते बंद पडणार आहे का ?” जी खरी मानून येथील लोक अंधारात जगता आहे. यांना हेच कळतं नाही की खाते बंद नाही पडणार पण त्याची गुणवत्ता नसेल व जेथे गुणवत्ताच नसेल तेथे गंगेची गटर होते. जी आज पवित्र उद्देश घेऊन निर्माण झालेल्या पोलीस विभागाची झाली आहे.
शिरीष प्रभाकर चव्हाण
संपादक : दि.सेपियन्स न्युज