(Disclaimer संबंधित लेख किंवा विश्लेषण हे प्रचलित व प्रस्थापित यंत्रणेच्या विरोधात नसून इंटेलिजन्सचे महत्व विशद करण्यासाठी आहे. दि.सेपियन्स न्यूज हे पोलिसांनी दंगलीवेळी केलेल्या कार्याचे नक्कीच अभिनंदन करते व त्यांच्या देशभक्तीची नक्कीच दखल ही घेत आहे परंतु असे अनुचित प्रकार न घडण्यासाठी इंटेलिजन्सही तेवढंच महत्त्वाचं आहे हा या लेखा मागचा किंवा विश्लेषणामागचा निव्वळ, शुद्ध आणि स्वच्छ हेतू आहे.)
आज राज्य भर पोलीस विभाग रुटमार्च काढीत आहे. हाच मार्च दंगली होण्या आधी काढला असता तर दंगलखोर धजावलेच नसते. आता एखाद्याला वाटेल कसे कळणार दंगल होणार आहे की नाही. तर इथेच खरी मेख आहे पोलीस विभागात SB व DSB ब्रँच प्रत्येक शहरात व जिल्ह्यात असतात त्याच बरोबर CID (INT) व केंद्र सरकारची IB देखील यांना INPUT देते. आणि पुढे होणाऱ्या घटनांचा अंदाज तात्काळ बांधता येतो त्याच बरोबर त्यांचे खबरी ही असतात. दुर्दैवाने नागपूरमध्ये ही यंत्रणा फेल ठरल्याचे दिसते आहे आणि त्यांनी माहिती दिलीच असेल तर तिच्यावर कारवाई का करण्यात आली नाही याचा विचार व तपास आधी करायला हवा व जबाबदारी ही निश्चित ? कारण या तिन्हीही संस्था वेलट्रेन व प्रोफेशनल असूनही प्रथम दर्शनी कामी न आल्याचे दिसते आहे.

वाईट हे की ज्यां समाजकंटकांना आपण अशिक्षित, जनावर, दृष्ट, भटके हुये समजतो त्यांची तयारी पाहिली की वाटत नाही त्यांनी हे सगळं बिनडोकपणे केलं असेल. पोलीस व शासकीय यंत्रणांपेक्षा यांचीच तयारी चोख दिसते. वृत्तवाहिन्यांवर दिसल्या प्रमाणे हा कट एका दिवसात शिजला नाही हे स्पष्ट आहे. कारण एका विशिष्ठ वेळेस ठिकठिकाणी एकत्र येऊन बरोबर लाठ्या व विविध हत्यार आणण, फक्त हिंदूंच्या गाड्या व दुकान वा मालमत्तेचे ठरवून नुकसान करणं, एका विशिष्ठ प्रो मुस्लिम व अँटी हिंदू घोषणा देणं, हिंदू नावे पाहूनच टार्गेट करणं, हल्लेखोर बाहेरील आहे हे हेतूत पेरणी करणं, विविध अफवा अतिशय योजना बद्ध पद्धतीने पसरविण, CCTV त येईल याची ही भीती न वाटणं, भविष्यात ही यांचीच दहशत असेल वाटेल असेच वर्तन करणं. हे एका क्षणात होत नाही. त्यासाठी एकछत्री मास्टरमाइंड असू शकतो आणि हे होणे केवळ नागपूर पुरता मर्यादित नसून यासाठी देशपातळीवर प्रयत्न झाल्याचे दिसते आहे.

म्हणून हा दोनचार टवाळखोरांचा गट व विषय नसून राष्ट्रद्रोह असल्याचीच शक्यता अधिक दिसते. हे केवळ श्रीराम मंदिर, औरंग्याची कबर, वक्त बोर्ड, छावा सिनेमा, दर्गा याच्याशी हा विषय निगडित नसून हे राष्ट्राच्या विखंडणापर्यंत जाते आणि याचा तपास, शोध, विश्लेषण नागपूर CP अथवा महाराष्ट्र राज्य पोलीस यांच्या मर्यादे पलीकडील असून यात आंतरराष्ट्रीय कट देखील असण्याची शक्यता दाट दिसते आहे. कारण एवढा मोठा कांड तोही महाराष्ट्र राज्याच्या दुसऱ्या राजधानीत होतो आणि त्यात सामान्य जनच नाही पोलीसही मारले जातात या धर्मांधांची एवढी मजल जाते हा योगायोग असूच शकत नाही. जर आमच्या या विश्लेषानात व तर्कात कुणाला शंका असेल तर या कांडात सहभागी असलेल्या आरोपींचे वकीलपत्र कोणते वकील घेता त्यांना कोण मोठमोठ्या फ्रीस देते. याचा अभ्यास करावा सर्व सामान्य समजले जाणारे वकील ज्यांची fees देखील कमी आहे ते यात नसतील याची दाट शक्यता आहे.

कुणी कुणाचं वकीलपत्र घ्यावं हा येथे प्रश्न नाही या भटके हुयेकडे एवढे पैसे येता कुठून ? कारण आजवर अशा प्रकरनांचा अभ्यास करता या समाजकंटकांकॅग्या वकीलांची fees देणारी सर्व खर्च उचलणारी मंडळी ही एका विशिष्ट विचारधारेशी संबंधित आहे हे दिसते. असे समजा तेच खरे स्पॉन्सरर आहेत असल्या प्रकारचे. तुम्ही करा आम्ही सांभाळतो म्हणनारेच नाही तर सांभाळणारे ही.

शेवटी एकच झालेला प्रकार हा यंत्रणेचे अपयश नक्की आहे हे नाकारता येणे शक्यच नाही आणि नाकारलेच तर पुढे अधिक मोठे होण्याला तयार रहा कारण भ्रमित व भरकटलेले ते नाही यंत्रणा आहे नी गाफील ही.
शिरीष प्रभाकर चव्हाण , संपादक : दि. सेपियन्स न्युज