80s च्या दशकात एक सामान्य व्यक्ती उदयास आला भारतीय उद्योगात आणि वाडिया, बिर्ला, नी अगदी tata ही हलवले. आज तो नाही पण त्याचा वंश भारतावर राज्य करीत आहे प्रश्न हा आहे की त्यानंतर त्याच्यासरखा कुणी आला नाही का ? आला ना 90s च्या दशकात जो त्याच्या पेक्षा ही बाप होता पण त्याचा शेवटचा प्रवास जेल ते सरकारी हॉस्पिटल झाला आणि तो गुन्हेगार व बदनाम होवून संपला. प्रश्न हा की 90s वाल्याच्या क्षमता अधिक असून ही तो का संपला तर उत्तर एकच राजकीय लोकांशी दुष्मनी वा त्यांच्या डोळ्यात येणं अनेकदा विरोध ही. तेच 80s वाल्यानं केलं नाही त्यांने या राजकारण्यांशी जुळवून घेतलं त्याचा राजकारण्यांना धोका नाही आधार वाटे. हा माणूस अहंकार देखावा उघड विरोध यापासून नेहमी दूर असे. जर कुणी आडवे आले तर त्याला प्रेमाने पैशाने युक्तीने जिंके मदत व नम्रता याचा उपयोग याने छान केला. ते मात्र 90s वाल्याला जमलं नाही उद्दामपणा, कुणाला ही विकत घेण्याची भाषा देखावा या व्यक्तीस भोवला नी त्याचा गेम यंत्रणा व नेत्यांनी केला ज्यांना त्याने पोसले विकत घेतले होते याने त्यांना विकत तर घेतले पण त्याच्यापेक्षा अधिक बोली कुणी लावू नये याची दक्षता नाही घेतली एकाने उद्योग प्रलोभन देऊन केला दुसऱ्याने अहंकार दाखवते. दोघे ही गुज्जू पण….आत्ता नाव 80s धीरूभाई, 90s हर्षद मेहता.
