रणजित कासले : त्यांना अनेक लोक वेडा, व्यसनी वा गंमतीचा विषय समजत असतील पण काही व्यक्तींनी यांची धास्ती घेतली आहे आणि ती ही खूप. त्यातीलच एक नाव आहे ADG निखिल गुप्ता. हे आम्ही विश्वासाने सांगीन कारण कासलेंनी लावलेले आरोप हे पुराव्यानिशी असून ते अतिशय गंभीर ही आहेत. ज्यांचे थेट संबंध ADG गुप्ता यांच्या कार्यपद्धती वर संशय व्यक्त करतात. जे पुढीलप्रमाणे आहेत.
1 ADG निखिल गुप्ता मराठी माणसाचा करीत असलेले द्वेष व अवमान.
2 कासलेंच्या मते त्यांच्या निलंबनात केलेले नुयमांचे उल्लंघन.
3 गुप्तांचे मुकेश नाहाटाशी असलेले सर्वच प्रकारचे संबंध.
4 कासलेंच्या मते गुप्तांच्या व्यवसायिक कंपन्या ज्यांची नावे राज टेक्सटाईल, निधी टेक्सटाईल राज शॉपिंगसेंटर सुपरमार्केट याचा तपास व्हावा.
5 याचाच एक अर्थ हा की गुप्तांची संपत्ती व्यवसाय हे आंतरराज्य व आंतरराष्ट्रीय स्तरावर ही असण्याची शक्यता आहे.
त्यासाठीच दि. सेपियन्स न्युज शासनाकडे मागणी करते की याचा सखोल तपास व्हावा आणि त्या करिता निखिल गुप्ता व त्यांच्या संबंधित लोकांचे PAN, ADHAR व फोन CDR details तपासावे त्याची सुरवात मुकेश नाहटा याच्या व त्याच्या पत्नी पासून करावी. पण आम्हास पूर्ण विश्वास आहे की असे काही होणार नाही उलटपक्षी कासलेंच्या व त्यांच्या संबंधित लोकांच्या जीविताला भविष्यात धोका होऊ शकतो. कारण कासलेंनी प्रथमदर्शनी सत्य वाटत असलेले अतिशय गंभीर आरोप ज्यांच्यावर केले आहे ते सर्वच big bull आहेत. विशेष हे की त्यातील अनेक सत्तेत आहेत यंत्रणेत आहे. समाधान एकच एवढ्या छोट्या पदावरील व्यक्ती ने या सर्वार्थाने प्रभावशाली लोकांशी जो पंगा घेतला आहे तशी हिम्मत खूप कमी लोक करतात त्यासाठी त्यांना कडक सॅल्युट.
शिरीष प्रभाकर चव्हाण
संपादक : दि.सेपियन्स न्युज