The Sapiens News

The Sapiens News

पोलीस तक्रार घ्यायला का टाळाटाळ करतात ?

कालच्या स्टेटसवर एका वाचकांनी प्रश्न केला की पोलीस पक्की तक्रार घ्यायला का टाळाटाळ करतात ? त्याच एका वाक्यात उत्तर आहे. Government pressure. खरं सांगायचे तर पोलीस नेहमी प्रेशर खाली काम करतात. सत्ताधारी व विरोधकांचा प्रचंड दबाव त्यांच्यावर असतो. तक्रार नोंदवून न घेण्याच मुख्य कारण हद्दीतील crime index कमी दिसणे. जो प्रत्येक शहराचा मिळून राज्याचा होतो आणि यावरच त्या राज्याचे सर्व काही ठरते जसे पर्यटक, उद्योगव्यवसाय, नागरिकांची गुणवत्ता सामाजिक जीवनमान आणि त्याही पेक्षा मानवाधिकार विरोधकांचा प्रतिरोध मोठा असतो. अनेकदा सरकार पडते देखील आणि हे सर्व होते पोलीसांनी तक्रार घेणे वा न घेण्यावर विचार करा एक छोट्या पोलिस ठाण्यातील तक्रार काय करू शकते. वाईट हे की त्यामुळेच तक्रार घेण्यात वा न घेण्यात पोलीस विभागाला नेहमी विरोधक व सरकार यांच्या दूषित वागणुकीस सामोर जावं लागतं. अर्थात इकडे आड नी तिकडे विहीर. काही केले तरी मरण. म्हणून ही पोलीस स्थानिक स्तरावर वादाचा तक्रारीचा निपटारा करतात. निदान त्याने काहींना चार पैसे मिळतात आणि जखमेवर तात्पुरती मलपट्टी होते आणि त्या मलमपट्टीचीच पोलीस fees घेतात. पण याने अराजक माजते दोषी बरोबर चांगला माणूस ही रगडला जातो. पोलीस विभागाची बदनामी होते ती वेगळीच आणि वकिलांचा रोष ही येतो अनेक वकील म्हणतात हे पोलीस आमच्या पर्यंत केसच येऊ देत नाही स्वतःच न्यायधीश होतात आणि कोर्ट ही पोलीस ठाण्यातच चालवितात जो पोलिसांचा अधिकारच नाही. इनशॉर्ट मरतात कायम पोलीसच.

Leave a Comment

Vote Here

Loading poll ...
Coming Soon
Do You Like Our Website?
UPSE Coaching

Recent Posts