दोन ADG होते एक ADG (ACB) पसरीचा, दुसरे ADG (गृहनिर्माण) राहुल गोपाल दोघांना DG, महासंचालक व्हायचे होते. कदाचित वरिष्ठता राहुल गोपालांची होती. अचानक एक दिवस news आली राहुल गोपाल यांच्यावर anti corruption trap झाला आणि ते पकडल्या गेले ऐन निवृत्तीच्या काळा जेलमध्ये गेले ज्यांनी पूर्ण सेवेत हजारो लोकांना जेलमध्ये धाडले असेल त्यांचं अस होईल असे वाटले नव्हते आणि ज्यांनी हा कट केवळ DG होण्यासाठी रचला ते खलीस्तानवाद्यांचे सहाय्यक होते. हे जुलीयन रिबोरो सरांनी त्यांच्या बुलेट फॉर बुलेट या आत्मचरित्रात लिहील आहे. विचार करा दोन अतिवरिष्ठ अधिकारी कुठल्या थराला जाऊन भांडतात. एखाद्याला आत्महत्येस प्रवृत्त करण्या इतपत हे गचाळ काम आहे. मान्य आहे राहुल गोपाळ भ्रष्ट होते पण ते भ्रष्ट होते म्हणून नाही त्यांना ट्रॅप केले ते पदाच्या आडवे येत होते म्हणून केले आणि करणारा ही कुठे स्वच्छ होता. म्हणून म्हणतो विभागात लोक sadly badly opportunistic असतात कुणाच्या दुःखाचा अडचणींत शोधणारे. आत्ताचेच ताजे उदाहरण देतो. नागपूरमध्ये झालेल्या दंगलीचे जे तेथील सर्वोच्च अधिकऱ्यांच्या नौकरीच्या दृष्टीने खूप वाईट आहे पण यातही अनेक लोक संधी शोधत असेल. नागपूर पोस्टिंग मिळवून मुख्यमंत्र्यांच्या मर्जीत येण्याची कारण नागपूर CP ADG आहे जेथून DG होण्याचा राजमार्ग जातो.
