एकंदर हगवणे प्रकरणात नणंद करिश्मा उर्फ पिंकी व तिचा मित्र निलेश चव्हाण हे मुख्य खलनायक आहेत. विशेष म्हणजे पिंकीच्या विरोधात मोठ्या सुनेने व निलेशच्या विरोधात त्याच्याच पत्नीने काही वर्षापूर्वी पोलिस तक्रार दिलेली परंतु त्यावर पोलिसांनी ठोस पावले न उचलल्याने आज एवढ अमानवी कृत्य ते करू शकले. प्रत्येक गुन्हेगाराची एक मोडस ऑपरेंटिन असते. तो आधी यंत्रणेची टेस्ट घेतो आणि त्याप्रमाणे प्लान आखतो. आणि त्यातूनच मोठे गुन्हे करण्याची त्याची हिंमत वाढते. आता कायद्याने जबाबदार त्याला पोलिस जरी असले तरी सिस्टिम कायद्याने चालत नाही ती चालते कायदा मोडून व वाकवून आणि ते काम राजकारण्यांना अधिक छान जमते. शिपाई निरीक्षकांचे सोडा अगदी अधीक्षकांनी जरी ठरवले एखाद्या राजकीय व्यक्ती विरोधात काही करायचे तर चार वेळा विचार करावा लागतो आणि एवढेही करून काही ऍक्शन घेतलीच तर दहा ठिकाणचा दबाव. वाईट हे की शेवटी बदलीसाठी त्यांचीच उंबरी झिजवावी लागतात मग एका सामान्य व्यक्तीसाठी का म्हणून स्वतःची हाल करून घेतील ही मंडळी असे ही लोक सत्याला साथ फक्त सोशल मीडियावर देतात आणि नेत्यांना 500 रुपये घेऊन मतपेटीत कुणासाठी लढायचे नी मरायचे हा प्रश्न नेहमी पोलिसांना असतो. त्यापेक्षा फेकलेला तुकडा निमूट गिळून शांत नौकरी काढायची आणि 500, 600 कोटीचे मालिक होऊन पेन्शन पचवायचे.





