The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

लालबागच्या राजाचा “गणेश मुहूर्त” पूजन सोहळा उत्साहात संपन्न

Lalbaugcha Raja 2025 : लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं हे 92 वं वर्ष आहे. नुकताच लालबागच्या राजाचा “गणेश मुहूर्त” पूजन सोहळा पार पाडला.

प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी लालबागच्या राजाचा “गणेश मुहूर्त” पूजन शनिवार दिनांक 14 जून 2025 रोजी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या शुभ हस्ते सकाळी ठीक 6 वाजता लालबागच्या राजाचे मूर्तिकार कांबळी आर्ट्स यांच्या कार्यशाळेत संपन्न झाला.

सदर प्रसंगी मंडळाचे खजिनदार श्री मंगेश दत्ताराम दळवी यांच्या शुभहस्ते लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पावती पुस्तकांचेही पूजन झाले.

यावर्षी लालबागच्या राजाचा गणेशोत्सव सोहळा गणेशचतुर्थी, बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025 ते अनंत चतुर्दशी,शनिवार दिनांक 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत साजरा होणार आहे.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं हे 92 वं वर्ष आहे.

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts